मिरची, मसाले उत्पादकांच्या आस्थापनाची तपासणी

११ नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले
मिरची, मसाले उत्पादकांच्या आस्थापनाची तपासणी

नंदुरबार | प्रतिनिधी - nandurbar

(Food and Drug Administration) अन्न व औषध प्रशासनामार्फत शहरातील (Chili) मिरची व मसाले (Spices) उत्पादकांच्या अस्थापनाची तपासणी करण्यात आली असून मिरची व मसाल्याचे ११ नमुने प्रयोशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यास संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे.

अन्न सुरक्षा व मानके कायद्यातंर्गत नंदुरबार येथे उन्हाळी मोहिमेत जिल्ह्यातील मे.विमल स्पायसेस, जयेशकुमार देवचंद जैन, राठी फुड प्रॉडक्ट, धनलक्ष्मी ट्रेडर्स, महादेव फुड प्रॉडक्ट,रजनीकांत भुराभाई आणि कंपनी, नंदुरबार या मिरची पावडर उत्पादक व मसाले अन्न पदार्थ विक्री करणाऱ्या आस्थापनाची तपासणी करण्यात आली. त्यांच्याकडून मिरची व मसाले पदार्थांचे 11 नमूने प्रयोगशाळेत विश्लेषणाकरीता पाठविण्यात आले आहेत. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यावर सदर आस्थापनावर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त संतोष कांबळे यांनी कळविले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com