जिल्हयातील सर्व खाजगी नर्सिंग महाविद्यालयांची चौकशी करा!

आदिवासी टायगर सेनेची मागणी, प्रकल्प अधिकार्‍यांना निवेदन
जिल्हयातील सर्व खाजगी नर्सिंग महाविद्यालयांची चौकशी करा!

नंदुरबार | प्रतिनिधी NANDURBAR

जिल्हयातील सर्व (Private College of Nursing) खाजगी नर्सिंग महाविद्यालयांची चौकशी करण्यात यावी व दोषी आढळणार्‍या संस्थाचालकांविरुद्ध कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आदिवासी टायगर सेनेतर्फे करण्यात आली आहे.

याबाबत आदिवासी टायगर सेनेतर्फे प्रकल्प अधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्हयात महाराष्ट्र नर्सिंग तसेच वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अखत्यारीतील नर्सिंग महाविद्यालये सुरु आहेत.

या वैद्यकीय महाविद्यालयात आदिवासी विद्यार्थ्यांडून परनवानगी नसतांना कॅपिटेशन फी तसेच इतर शुल्क घेतले जातात. परंतू कुठलीही नोंद केली जात नाही. विद्यार्थ्यांकडून स्कॉलरशिपचे फॉर्म भरले जातात.

अनुत्तीर्ण होण्याच्या भितीमुळे विद्यार्थी किंवा पालक तक्रार करीत नाहीत. तसेच भौतिक सुविधा अपूर्ण आहेत. प्रसाधनाची तसेच पिण्याच्या पाण्याची सुद्धा सोय नसते. म्हणून जिल्हयातील सर्व खाजगी नर्सिंग महाविद्यालयांची चौकशी करण्यात यावी व दोषी आढळणार्‍या संस्थाचालकांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर आदिवासी टायगर सेनेच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सौ.सारीका मोरे (Sarika More) यांची सही आहे.

Related Stories

No stories found.