कृषि निविष्ठांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी सात भरारी पथके

जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी निलेश भागेश्‍वर यांची माहिती
कृषि निविष्ठांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी सात भरारी पथके
USER

नंदुरबार | प्रतिनिधी- NANDURBAR

खरीप हंगाम २०२२-२०२३ साठी जिल्ह्यात मुबलक प्रमाणात (Chemical fertilizers, seeds) रासायनिक खते, बियाणे व किटकनाशके उपलब्ध करुन देण्यात आले असून बोगस बियाणे विक्रीला आळा घालणे, रासायनिक खते, कीटकनाशकांच्या गुणवत्ता नियंत्रणासाठी जिल्हास्तरावर एक तसेच तालुकास्तरावर सहा असे सात भरारी पथक गठित करण्यात आले आहेत, अशी माहिती (District Superintendent Agriculture Officer) जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी निलेश भागेश्वर यांनी दिली.

जिल्हास्तरावर एक पथक स्थापन केले असून कृषि विकास अधिकारी, जि.प. हे भरारी पथकाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पथकात मोहिम अधिकारी जि.प. हे सदस्य सचिव म्हणून जिल्हा गुणवत्ता अधिकारी नियंत्रण निरीक्षक व जिल्हास्तरीय निरीक्षक वजनेमापे हे सदस्य आहेत.

तालुकास्तरावर सहा पथक स्थापन केले असून तालुका कृषि अधिकारी याच्या अध्यक्षतेखाली भरारी पथके कार्यरत करण्यात आले असून कृषि अधिकारी, पंचायत समिती, तालुकास्तरीय निरीक्षक वजनेमापे, तसेच संबंधित कार्यक्षेत्राचे मंडळ कृषि अधिकारी हे सदस्य असतील. तर कृषि अधिकारी, पंचायत समिती, हे सदस्य सचिव असतील.

तालुकास्तरावरील भरारी पथक प्रमुखाचे नाव व संपर्क क्रमांक असे- नंदुरबार एस.ए.शेळके (९४०४११०८७८), नवापूर बी.जे.गावीत (७५८८३०३६९२), अक्कलकुवा एन.ए.गढरी (९४२१५१२२७२), शहादा के.ई.हडपे (८०५५८२४८६४) तळोदा एन.आर.महाले (९४२००६०५२८) तर अक्राणीसाठी आर.एस.महाले (९४०४९७०३३५/ ८३२९५३६१५९ ) असे आहेत.

या पथकामार्फत कृषि सेवा केंद्रांची वेळोवेळी तपासणी करण्यात येईल. यामुळे शेतकर्‍यांची फसवणूक टळणार आहे. तसेच अनधिकृतरित्या विक्री होणार्‍या बियाणे व खतांच्या विक्रीला प्रतिबंध बसणार आहे.

शेतकर्‍यांनी अधिकृत विक्रेत्यांकडूनच बियाण्याची खरेदी करावी, बियाणे खरेदीची पावती, खरेदी केलेल्या बियाणे पाकिटाचे टॅग व लॉट क्रमांक पडताळून पाहावे. पेरणी झाल्यावर बियाणे पाकिट पीक निघेपर्यंत सांभाळून ठेवावे, शेतकर्‍यांनी अनधिकृत बियाण्याची खरेदी करु नये,

कीटकनाशके, तण नाशकांची खरेदी करताना त्यांची अंतिम मुदत तपासून घ्यावी. खत विक्री करणार्‍या फ्लाय सेलर्सकडून खतांची खरेदी करु नये. जादा दराने कृषि निविष्ठाची विक्री करत असल्यास त्याबाबत तक्रार जिल्हास्तरीय किंवा तालुकास्तरीय पथकाकडे करावी.

तसेच कृषि निविष्ठाविषयी असलेल्या अडचणी, तक्रारी व मार्गदर्शनासाठी कृषि विभागाच्या टोल फ्री क्रमांक १८००२३३४००० वर संपर्क साधावा,असे आवाहनही कृषि विभागामार्फत करण्यात येत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com