सातपुड्यातील डाकीण प्रथेची माहिती पोहचणार जर्मनीत

जर्मनीतील दोन कलाकार सातपुड्यात दाखल
सातपुड्यातील डाकीण प्रथेची माहिती पोहचणार जर्मनीत

नंदुरबार । Nandurbar। प्रतिनिधी

नंदुरबार जिल्ह्यातील डाकीण प्रश्नांची (Dakin questions) दाहकता समजून डॉक्युमेंट्री (Documentary) तयार करण्यासाठी जर्मनीहून (Germany) दोन अवलिया कलाकार (Artist) सातपुड्यात दाखल झाले आहेत. अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील सरी व नर्मदा काठावरील जांगठी येथील डाकीण पीडित महिलांची (women) भेट घेऊन त्यांची व्यथा त्यांनी समजून घेतली.

आदिवासीबहुल असणार्‍या नंदुरबार जिल्हात डाकीण प्रश्नाचं (Dakin questions) धगधगत वास्तव सार्‍यांना ज्ञात आहे. डाकीणीच्या संशयावरून महिलेला मारहाण (Beating a woman),बहिष्कृत करणे,यांसारखे व इतर प्रकार सातत्याने समोर येत असतात. आता या प्रश्नाची जागतिक स्तरांवर (Globally) देखिल दखल घेतली जात असून या डाकीण प्रश्नाचा अभ्यास करून त्यावर माहितीपट (Documentary) तयार करण्यासाठी जर्मनीहून दोन फ़िल्म कलाकार सातपुड्यात दाखल झाले आहेत.

होलगर व मॅक्स अशी त्या दोघांची नावे असून होलगर हा फिल्म मेकर आहे तर मॅक्स हा कॅमेरामन आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (Maharashtra Andhashraddha Nirmulan Samiti) कार्यकर्त्यांच्या मदतीने ते मागील तीन दिवस डाकीण प्रश्न व सोबतच अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्य समजून घेत आहेत.

सोशल मीडियाच्या (Social media) माध्यमातून या दोघांनी मुंबईच्या अंनिस कार्यकर्त्यांना संपर्क केल्यानंतर ते मुंबई दाखल झाले. तेथून नाशिक गाठत त्यांनी जात पंचायत पिडीत प्रकरणांची माहिती घेतली. आदिवासी भागातील (tribal areas) अंधश्रध्दा व डाकिणीचा प्रश्न समजून घेण्यासाठी ते नंदुरबार जिल्ह्यात दाखल झाले आहेत.

बुधवारी 23 मार्च रोजी नंदूरबार येथिल अंनिसचे कार्यकर्ते किर्तीवर्धन तायडे,वसंत वळवी,सुर्यकांत आगळे यांनी नवापूर तालुक्यातील देवमोगरा या गावात चमत्कार सादरीकरण व प्रबोधन कार्यक्रम (Awareness program) सादरीकरण केले या कार्यक्रमाचे चित्रीकरण या दोन्ही कलाकारांनी केले व स्थानिक ग्रामस्थाशी संवाद साधला.

गुरुवारी दि 24 मार्च रोजी डाकीण प्रश्नांचा अभ्यास व चित्रीकरणासाठी त्यांनी अक्कलकुवा तालुक्यातील सरी येथील डाकीण पीडित महिलेची भेट घेऊन तिची मुलाखत (Interview) घेतली व कुटुंबियाशी संवाद साधला. त्यानंतर शुक्रवार 25 मार्च रोजी नर्मदा काठावरील जांगाठी या अतिदुर्गम भागातील दुसर्‍या डाकिण पीडित महिलेला भेटण्यासाठी हे दोन्ही गेले. त्यांच्यासोबत महाराष्ट्र अंनिसचे राज्य सरचिटणीस विनायक सावळे,अक्कलकुवा अनिस शाखेच्या कार्याध्यक्षा सुमित्रा वसावे, किरण शेवाळे हे असून हे त्यांना डाकिण प्रश्नाबाबत अधिक माहिती देण्याबरोबर दुभाषीची देखिल भूमिका पार पाडत आहेत.

Related Stories

No stories found.