आयान कारखान्यावर आयकर विभागाचा छापा?

आयान कारखान्यावर आयकर विभागाचा छापा?

नंदुरबार Nandurbar । प्रतिनिधी

तालुक्यातील समशेरपूर (Samsherpur) येथील आयान मल्ट्रीट्रेड एलएलपी साखर कारखान्यावर (Ian Multitrade LLP Sugar Factory) आयकर विभागाने (Income tax) धाड (raid) टाकली. मात्र, नेमका हा छापा कोणत्या कारणासाठी होता ती माहिती उपलब्ध होवू शकली नाही.

राज्यभरातील सहकारी साखर कारखाने आयकर विभागाच्या रडारवर आहेत. दरम्यान, तालुक्यातील समशेरपूर येथील आयान मल्टीट्रेड एलएलपी साखर कारखान्यावरदेखील आज सकाळपासूनच आयकर विभागाच्या अधिकार्‍यांच्या वाहनांचा ताफा धडकला. कारखान्यात झाडाझडती घेण्यात आली. तेथील कागदपत्रांची तपासणी करण्यात आल्याचे समजते. मात्र, काय कारवाई झाली याबाबत माहिती उपलब्ध होवू शकली नाही.

सदर साखर कारखाना सचिन शिंगारे यांच्या मालकीचा असून ते पार्थ पवार यांचे निकटवर्तीय असल्याचे समजते.

पुर्वी या कारखान्याचे पुष्पदंतेश्वर सहकारी साखर कारखाना असे नाव होते. तो सहकार तत्वावर सुरु होता. परंतू 2014-15 अवसायानात गेल्याने कारखान्याची विक्री झाली. त्यावेळी अँस्टोरीया असे नामकरण झाले होते. त्यांनी पुणे मध्यवर्ती सहकारी बॅकेकडुन कर्ज घेतल्याचे समजते. मात्र, गेल्या तीन वर्षांपापासून कारखान्याचे नाव पून्हा बदलून आयान शुगर इंडस्ट्रीज असे ठेवण्यात आले आहे.

उपलब्ध माहितीनुसार, सदर कारखान्याची मालमत्ता दीडशे कोटीची असून ती फक्त 47 कोटीत खरेदी करण्यात आल्याचे समजते. कारखान्याची गाळप क्षमता 8हजार मेट्रीक टन असून डिस्टीलरी आणि वीज निर्मिती प्रकल्प देखील प्रगतीपथावर आहे. मात्र, आज सकाळपासूनच आयकर विभागाच्या अधिकार्‍यांचा मोठा ताफा कारखान्यावर पोहचला असून मोठया प्रमाणावर झाडाझाडती सुरु झाली आहे. मात्र, त्यात काय आढळून आले याबाबत माहिती उपलब्ध होवू शकलेली नाही.

Related Stories

No stories found.