नंदुरबार पालिकेच्या नूतन वास्तूचे २९ ऑक्टोबरला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

जीटीपी कॉलेजवर शिंदे गटाची जाहीर सभा; माजी आ. चंद्रकांत रघुवंशी यांची माहिती
नंदुरबार पालिकेच्या नूतन वास्तूचे २९ ऑक्टोबरला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

नंदुरबार | प्रतिनिधी- NANDURBAR

येथील नगरपालिकेच्या (municipality) नूतन वास्तूचे (New buildings) उद्घाटन (Opening)मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्या हस्ते दि.२९ ऑक्टोबरला होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या या दौर्‍याची तयारी सुरु झाली आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे हे पहिल्यांदाच नंदुरबारला येणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह (Among the activists) संचारलेला (Enthusiastic) असून, नियोजनासाठी शिंदे गटाचे शिवसेनेचे नेते, माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील रामवाडीत बैठक घेण्यात आली.

नंदुरबार नगर परिषदेच्या नूतन वास्तूचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दि.१४ ऑक्टोबरला होणार होते. परंतु, अपरिहार्य कारणास्तव कार्यक्रम स्थगित झाला होता. आता दि.२९ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्य हस्ते या इमारतीचे उद्घाटन करण्यात येणार आहे.

उद्घाटनानंतर ग.तु.पाटील महाविद्यालयाच्या मैदानावर शिंदे गटाचा शिवसेनेची जाहीर सभा होणार असल्याने पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक रामवाडीत घेण्यात आली. यावेळी माजी आ.चंद्रकांत रघुवंशी, जि.प. सदस्य तथा शिंदे गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख ऍड. राम रघुवंशी, माजी सभापती विक्रमसिंह वळवी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक डॉ.सयाजीराव मोरे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर पंचायत समितीच्या सभापती माया माळसे, शिंदे गटाच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख किरसिंग वसावे, शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष बी.के.पाटील, ज्येष्ठ कार्यकर्ते ताराचंद माळसे, उपजिल्हाप्रमुख कृष्णादास पाटील, तालुका प्रमुख रवींद्र गिरासे, महानगर प्रमुख विजय माळी आदी उपस्थित होते. बैठकीत शिवसेनेचे पदाधिकारी, पालिकेचे नगरसेवक, सरपंच, उपसरपंच, ग्रा.पं व सेवा सोसायटीचे सदस्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांच्या संभाव्य कार्यक्रम

बैठकीत माजी आ. चंद्रकांत रघुवंशी यांनी मुख्यमंत्र्यांच्या संभाव्य दौर्‍याच्या कार्यक्रमाविषयी माहिती दिली. ते म्हणाले, पालिकेच्या इमारतीच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकाळी १० वाजता मुंबई येथून प्रयाण करतील.

११.३० वाजता पोलीस मुख्यालयाच्या आवारातील हेलिपॅडवर आगमन होईल. १२.४५ वाजेदरम्यान पालिकेच्या नुतन वास्तूचे उद्घाटन होईल. त्यानंतर श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरात उद्घाटनाच्या शासकीय कार्यक्रम होईल. दुपारी १.३० ते २ वाजेच्या दरम्यान ग.तु पाटील महाविद्यालयाच्या पटांगणावर शिंदेच्या शिवसेनेची जाहीर सभा होणार आहे.

कार्यकर्त्यांनी तयारीला लागावेः ऍड.राम रघुवंशी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौर्‍यानिमित्त कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागावे. प्रत्येक गावात कार्यकर्त्यांनी बैठका घेऊन नियोजन करावे. पालिका उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर जाहीर सभेत हजारोच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शिंदे गटाच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ऍड.राम रघुवंशी यांनी बैठकीत केले.

मानपत्र देऊन मुख्यमंत्र्यांचा नागरी सत्कार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पालिकेचे उद्घाटन झाल्यानंतर श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरात त्यांना मानपत्र देऊन जाहीर नागरी सत्कार करण्यात येणार आहे. कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्री व आमदारांना निमंत्रित करण्यात आल्याचे रघुवंशी यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com