
नंदुरबार ।Nandurbar प्रतिनिधी
विद्यार्थ्यांनी (Students) खेळा सोबतच स्पर्धा परीक्षेच्या (competitive examination) माध्यमातून करिअर (build a career) घडवावे, असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील (District Superintendent of Police PR Patil) यांनी चाचा नेहरु बाल महोत्सवा ()Chacha Nehru Children's Festival उद्धाटन प्रसंगी केले.
महिला व बाल विकास कार्यालय,नंदुरबार यांच्यावतीने आयोजित दोन दिवशीय चाचा नेहरु बाल महोत्सवाचे उद्धाटन जिल्हा क्रीडा संकुल, खामगांव रोड, नंदुरबार येथे आज श्री.पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील, जिल्हा माहिला व बाल विकास अधिकारी राजेंद्र बिरारी,जिल्हा कोषागार अधिकारी देविदास पाटील, जिल्हा परिविक्षा अधिकारी गिरीष जाधव, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी उमेश पाडवी, बाल कल्याण समिती अध्यक्षा अॅड.निता देसाई, बाल कल्याण समिती सदस्य अॅड.श्रीमती सीमा खत्री, श्रीमती.मिनाक्षी देसले, श्रीमती. पुष्पलता ब्राम्हणे, डॉ. साहेबराव अहिरे, तसेच बाल न्याय मंडळाचे सदस्य नितीन सनेर, श्रीमती ज्योती कळवणकर शिव छत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त बळवंत निकुंभ, जिल्हा क्रीडा संघटक ईश्वर धामणे आदी उपस्थित होते.
यावेळी पोलीस अधीक्षक श्री.पाटील म्हणाले की, सोरापाडा येथील रुखमाबाई बालिकाश्रम विद्यार्थींनीनी सामान्य ज्ञान स्पर्धेत सुवर्ण पदक, लॅपटॉप, घड्याळ व प्रशस्तीपत्रक मिळवून त्यांनी आपल्या समोर एक वेगळा आदर्श घालून दिला आहे. नंदुरबार हा जिल्हा आदिवासी जिल्हा असून सुध्दा अत्यंत प्रतिकुल परिस्थितीमध्ये येथील बालिकाश्रमाच्या विद्यार्थ्यांनी चांगले यश मिळवून दाखविले आहे. अशाच प्रकारचे यश प्रत्येकांनी क्रीडा स्पर्धा, निबंध स्पर्धा, चित्रकला तसेच स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून मिळवावे.
मुलांमधील सुप्त गुणांना वाव देऊन त्यांच्यात एकमेकांविषयी बंधुभाव, सांघिक भावना निर्माण होण्यासाठी शासनामार्फत चाचा नेहरु बाल महोत्सवासारखे चांगले उपक्रम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. कोरोनाकाळात शाळा बंद होत्या त्यावेळी मोबाईलवर ऑनलाईन शिक्षण सर्वस्तरावर झाले. परंतू आता विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर हा सामान्य ज्ञान व अभ्यासासाठीच करावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
प्रास्ताविकांत बोलतांना जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्री.बिरारी म्हणाले की, बाल कल्याण क्षेत्रात कार्यरत असलेल्या स्वयंसेवी संस्थांमध्ये पुनर्वसनासाठी दाखल झालेल्या अनाथ, निराधार, उन्मार्गी मुलांमधील सुप्त गुणांना वाव देऊन त्यांच्यात एकमेकांविषयी बंधुभाव, सांघिक भावना निर्माण होण्यासाठी शासनामार्फत चाचा नेहरु बाल महोत्सव आयोजित केला जात आहे. या महोत्सवांत लहान गट व मोठ्या गटासाठी 100 मीटर धावणे, उंच उडी, लांब उडी, गोळा फेक, चित्रकला, निबंध स्पर्धा, बुद्धीबळ, हस्ताक्षर, खो-खो, 400 मीटर धावणे, समूह गीत, समुह नृत्य तसेच विविध वैयक्तिक नृत्य स्पर्धेंचे आयोजन या दोन दिवसांत करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.प्रारंभी, मान्यवराचे स्वांगत आदिवासी नृत्य करुन करण्यात आले. यानंतर पोलीस अधिक्षक श्री.पाटील यांनी मशाल प्रज्वलीत व दिप प्रज्वलीत करुन क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी जिल्हा महिला आणि बाल विकास विभाग, नंदुरबार अंतर्गत केअर फॉर यु, पुणे या संस्थेमार्फत आयोजित सामान्य ज्ञान स्पर्धेंत रुखमाबाई बालिकाश्रम सोरापाडा, ता.अक्कलकुवा येथील बालगृहातील विद्यार्थिंनीने सांघिक प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल त्यांना मिळालेले सुवर्ण पदक, लॅपटॉप, घडयाळ व प्रमाणपत्र देवून त्यांचा मान्यवराच्या हस्ते सत्कांर करण्यात आला. यावेळी संस्था चालक संदीप पाटील, अधिक्षिका कविता वळवी उपस्थित होत्या.या महोत्सवांत एस.ए.मिशन हायस्कुल, पी.के.पाटील माध्यमिक विद्यालय, यशवंत विद्यालय, नगर पालिका शाळा क्रमांक 12,नंदुरबार, रुखमाबाई बालिकाश्रम, सोरापाडा, जन साहस संस्थेच्या विद्यार्थ्यांसह संयोजन समितीचे सदस्य व विविध शाळा महाविद्यालयांचे शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बाल महोत्सवात आज होणारे कार्यक्रम
मंगळवार 13 डिसेंबर, 2022 रोजी सकाळी 10 वाजता सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन व दुपारी 2 वाजता समारोप व बक्षिस वितरण कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे. तरी या चाचा नेहरु बाल महोत्सवाचा नागरिक, शिक्षक व विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी राजेंद्र बिरारी यांनी केले आहे. कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिविक्षा अधिकारी विजय लोखंडे, सुनिल पवार, संरक्षण अधिकारी रविंद्र काकळीत, सहायक लेखाधिकारी अशोक जगताप, रेणूका मोघे यांच्या महिला व बाल विकास अधिकारी, क्रीडा अधिकारी यांच्या सह बाल संरक्षण समितीच्या सदस्यांनी विशेष सहकार्य केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा.उमेश शिंदे तर आभार प्रदर्शन गिरीष जाधव यांनी केले.