विशेष घटक योजनेतील निधी खर्चात नंदुरबार जिल्हा राज्यात अव्वल

100 टक्के निधीचा विनियोग ; सीईओंकडून समाजकल्याण सभापतींचा सत्कार
विशेष घटक योजनेतील निधी खर्चात
 नंदुरबार जिल्हा राज्यात अव्वल

नंदुरबार । Nandurbar। प्रतिनिधी

समाजकल्याण विभागाच्या (Department of Social Welfare) विशेष घटक योजनेतील निधीचा विनियोग (Appropriation of funds) करण्यात नंदुरबार जि.प. (ZP)चा समाजकल्याण विभाग (Social Welfare Department) राज्यात अव्वल ठरला आहे. वेळोवेळी पाठपुरावा केल्याने विशेष घटक योजनेतील सन 2021-22 मधील 7 कोटी 15 लाख रुपये इतक्या रकमेचा निधी 100 टक्के खर्च झाल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी (Chief Executive Officer) रघुनाथ गावडे (Raghunath Gawde) व समाजकल्याण अधिकारी श्री. नांदगावकर यांनी समाजकल्याण सभापती रतन पाडवी (Speaker Ratan Padvi) यांचा सत्कार (Hospitality) केला.

समाजकल्याण विभागांतर्गत विशेष घटक योजनेसाठी नंदुरबार जि.प.ला 7 कोटी 15 लाख रुपये इतका निधी (funds) प्राप्त झाला होता. सदर निधीच्या माध्यमातून दलीत वस्तीत रस्ते, पेव्हरब्लॉक, स्वच्छतागृह, समाज मंदिर आदी कामे करण्यात येतात. सन 2021-22 या आर्थिक वर्षात समाजकल्याण सभापती रतन पाडवी (Speaker Ratan Padvi) यांनी जि.प.च्या सर्वसाधारण सभा, (General Assembly) स्थायी सभा आदींच्या माध्यमातून वेळोवेळी पाठपुरावा करत मंजूरी दिल्याने सदर निधी खर्च (Funding costs) झाला आहे. जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे व समाज कल्याण अधिकारी श्री.नांदगावकर यांनी योग्य नियोजन व सातत्यपूर्ण पाठपुरावा केल्याने मार्च एंडअखेर 100 टक्के निधी खर्च करण्यात समाजकल्याण विभागाला यश मिळाले आहे. एकूण 7 कोटी 15 लाख इतका 100 टक्के निधी खर्च (Funding costs) करण्यात आला आहे.

सदरच्या निधीच्या माध्यमातून सन 2021-22 मध्ये जोडरस्ते व दिवाबत्तीसाठी 60 लाख रुपये, वस्तीगृहांना सीसीटीव्ही (cctv) बसविण्यासाठी 24 लाख 95 हजार रुपये खर्च करण्यात आले आहे.

यासोबतच समाजकल्याण विभागाच्या माध्यमातून 120 दिव्यांगांना (disabled) झेरॉक्स मशिनसाठी (Xerox machine) 1 कोटी 20 लाख तसेच 5 टक्के दिव्यांग कल्याणकारी योजनेतून झेरॉक्स मशिन वाटपासाठी 15 लक्ष खर्च करण्यात आले आहे. तर सन 2020-21 मध्ये मागासवर्गीय शेतकर्‍यांना (farmers) सौरउर्जेवर चालणार्‍या विविध वस्तूंसाठी 4 कोटी 70 लक्ष रुपये इतका निधी खर्च झाल्याची माहिती समाजकल्याण विभागाच्यावतीने देण्यात आली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com