नंदुरबारात संपकरी एस.टी.कर्मचार्‍यांनी घातला ‘गोंधळ’

नंदुरबारात संपकरी एस.टी.कर्मचार्‍यांनी घातला ‘गोंधळ’

नंदुरबार | प्रतिनिधी NANDURBAR

कार्तिकी एकादशीचे औचित्य साधत आज नंदुरबार आगाराच्या आंदोलक एसटी कर्मचार्‍यांनी खोपडी पूजा मांडत थेट आंदोलन स्थळी जागर गोंधळ घातला.

एस.टी. महामंडळाचे शासनात विलीनीकरण करण्यात यावे, या मागणीसाठी एसटी कर्मचार्‍यांनी पुकारलेल्या संपाकडे शासनाने पाठ फिरवल्याने १८ दिवसांपासून आंदोलन सुरु आहे.

दरम्यान, आज आंदोलक एसटी कर्मचार्‍यांनी तुळशी विवाहाची पुजा मांडत आंदोलनस्थळी वाघ्या मुरळीसह जागर गोंधळ केला. या झोपेचे सोंग घेतलेल्या शासनाला कर्मचार्‍यांच्या समस्येप्रती जाग येवुन आंदोलक एसटी कर्मचार्‍यांमधील ऐक्य कायम असल्याच्या संदेशासाठीच हा उपक्रम राबविल्याचे कर्मचार्‍यांकडून सांगण्यात आले. यावेळी आंदोलक कर्मचार्‍यांनी स्वतः वाघ्या मुरळीसोबत जागर गोंधळात सहभाग नोंदवला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com