चिनोदा परिसरात शेतकर्‍यांकडून पावसाळ्यापूर्वी शेणखत टाकण्याची लगबग

चिनोदा परिसरात शेतकर्‍यांकडून पावसाळ्यापूर्वी शेणखत टाकण्याची लगबग

चिनोदा ता.तळोदा । Chinoda। वार्ताहर

खरीप हंगामासाठी (kharif season) शेतकरी (farmers) उन्हाची पर्वा न करता शेती मशागतीला (Cultivation of agriculture) लागला असून शेतीची पोत सुधारण्यासाठी शेतकर्‍यांकडून पावसाळ्यापूर्वी शेतात शेणखत (Manure) टाकण्याकडे कल दिसून येत आहे.

दिवसेंदिवस पशुधन (Livestock) झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे शेतीला (Agriculture) आवश्यक असलेले शेणखत (Manure) सध्या मिळणे कठीण झाले आहे. ज्या शेतकर्‍यांकडे जनावरांची संख्या जास्त आहे. त्यांच्याकडे शेणखत आहे. मात्र ते ही आपल्या शेतात टाकण्यावर भर देत आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे जमीन जास्त आहे मात्र जनावरांची संख्या कमी आहे अशा शेतकर्यांची मोठी पंचाईत होत आहे.

शेणखताला पर्याय म्हणून रासायनिक खतांचा (chemical fertilizers) मारा शेतात केला जात आहे. यातून उत्पादन वाढत असले तरी शेतीची पोत कमी होत आहे. रासायनिक खतांचे दुष्परिणाम होत असल्याने रासायनिक खतांऐवजी शेणखत वापरण्याचा विचार केला तर शेतकर्‍यांच्या खिशाला कात्री लागत आहे.

यांत्रिकीकरणाच्या युगात शेतकर्‍यांकडून पशुधनही कमी झाले आहे. पूर्वी शेतकरी शेतीसोबत पशुपालन देखील करत असे अनेक शेतकरी दुधाळू जनावरांसोबत भाकड जनावरेही पाळायचे. त्यामुळे जनावरांपासून मोठ्या प्रमाणात शेणखत मिळत होते. मात्र अनेक शेतकर्यांनी शेतीसह पशुपालन करणे सुरू केले आहे. दुग्धव्यवसायातून (Dairy business) ते आर्थिक स्थिती बळकट करीत आहे. त्यांच्याकडे पशुपालन असल्याने शेणखत मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत आहे. त्यामुळे हे व्यावसायिक ग्रामीण भागातील शेतकर्‍यांना शेणखत विकत आहे. त्यामुळे चिनोदा परिसरातील शेतकरी पावसाळ्यापूर्वी शेतामध्ये शेणखत टाकत असल्याचे चित्र सध्या दिसूत येत आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com