या शैक्षणिक वर्षातही पुनर्रचित सेतू अभ्यासक्रमाची अंमलबजावणी
File Photo

या शैक्षणिक वर्षातही पुनर्रचित सेतू अभ्यासक्रमाची अंमलबजावणी

९ जूनला उद्बोधन वर्गाचे आयोजन

तळोदा | ता.प्र.- TALODA

शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये शाळा (School) पूर्ण क्षमतेने आणि नियमितपणे सुरू झाल्या नसल्याने विद्यार्थ्यांना (students) इयत्तानिहाय आणि विषयनिहाय अध्ययन निष्पत्ती संपादन (Editing study outcomes) करण्यामध्ये अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे राज्य स्तरावरून शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्येही सर्वच विद्यार्थ्यांसाठी पुनर्रचित सेतू अभ्यासाची (Reconstructed bridge study) अंमलबजावणी करण्यात येणार आहे. दरम्यान, शालेय स्तरावर पुनर्रचित व अभ्यासाची प्रभावी अंमलबजावणी (Implementation) होण्यासाठी सर्व क्षेत्रिय अधिकार्‍यांसाठी दि.९ जून २०२२ रोजी उद्बोधन सत्राचे आयोजन ऑनलाईन (Online) पद्धतीने करण्यात आले आहे.

असे असेल पुनर्रचित सेतू अभ्यासाचे स्वरूप

इयत्ता दुसरी ते दहावीच्या मराठी इंग्रजी सामान्य विज्ञान गणित आणि सामाजिकशास्त्र या विषयांसाठी पुनर्रचित सेतू अभ्यास तयार करण्यात आला आहे.

सदर अभ्यास इयत्तानिहाय व विषयनिहाय तयार करण्यात आला असून मागील इयत्तांच्या महत्त्वाच्या क्षमतांवर आधारित आहे. पुनर्रचित सेतू अभ्यासात तीस दिवसांच्या शालेय कामकाजाचे दिवस असून यामध्ये दिवसनिहाय कृतीपत्रिका देण्यात आल्या आहेत.

सदर अभ्यास मराठी उर्दू आणि इंग्रजी माध्यमासाठी तयार करण्यात आला आहे.सदर पुनर्रचित सेतू अभ्यासातील कृतीपत्रिका या विद्यार्थी केंद्रित व कृती केंद्रित तसेच अध्ययन निष्पत्तीवर आधारित आहेत.

अधिक संबोध स्पष्ट करण्याकरीताही ई साहित्याच्या लिंक देण्यात आलेल्या आहेत. पुनर्रचित सेतू अभ्यास व पूर्वचाचणी परिषदेच्या संकेतस्थळावर दि.९ जून पासून उपलब्ध करून देण्यात येतील तसेच उत्तर चाचणी दि.२३ जुलै ते ६ ऑगस्ट २०२२ पर्यंत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

सदर सेतू अभ्यास सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील इयत्ता दुसरी ते दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांनी पूर्ण करणे बंधनकारक आहे.

मागील इयत्तांच्या महत्त्वाच्या क्षमता या अभ्यासातून संपादित होतील याकरिता शालेय कामकाजाच्या तीस दिवसांमध्ये सेतू अभ्यासाची ची अंमलबजावणी काटेकोर पद्धतीने करण्यात येणार आहे. शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी त्या त्या दिवसाची कृतिपत्रिका सोडवणे अपेक्षित आहे. या कृती पत्रिका विद्यार्थी स्वतंत्र वहीमध्ये सोडू शकतात.

सदर सेतू अभ्यास पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांची विषयनिहाय उत्तरचाचणी घेण्यात येणार आहे. सदर अभ्यास पूर्ण झाल्यानंतर त्या त्या इयत्तेच्या विषयाची नियमित अध्ययन-अध्यापन प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.

शालेय स्तरावर पुनर्रचित व अभ्यासाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी सर्व क्षेत्रिय अधिकार्‍यांसाठी दि.९ जून २०२२ रोजी उद्बोधन सत्राचे आयोजन ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे. यामध्ये पुनर्रचित सेतू अभ्यास अंमलबजावणीविषयी सेतू अभ्यासाचे स्वरूप कालावधी आणि क्षेत्रीय स्तरावर करावयाची कार्यवाहीबाबत उद्बोधन करण्यात येणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com