
नवापूर | श.प्र.- NAVAPUR
तालुक्यातील आमलाण येथे वनविभागाच्या (Forest Department) पथकाने दोन लाख रुपये किमतीचे अवैध लाकूड जप्त केले आहे. गुप्त बातमीवरून सहाय्यक वनसंरक्षक धनंजय पवार, गणेश मिसाळ, वनक्षेत्रपाल स्नेहल अवसरमल, रेंज स्टाफ चिंचपाडा व नंदुरबार स्टाफ व नवापूर स्टाफ यांच्यासह आमलाण (कोकणी पाडा) येथे जावून तपास केला.
रस्त्याच्या बाजूच्या शेतात शोध घेतला असता बेवारस अवैधरित्या साग चौपट-३ घ.मी-०.४०५ व हलदू गोल नग-४ घ.मी-२.२४७ माल लपवलेला मिळून आला. सदर मालाचे एकूण घ.मी-२.६५२ मालाची किंमत अंदाजे २ लाख आहे.
सदर माल जप्त करून सदरचा माल शासकीय वाहनाने व जेसीबीच्या साह्याने ट्रॅक्टर मध्ये भरून शासकीय विक्री आधार नवापूर येथे जमा केला.
सदर कारवाई वनपाल युवराज भाबड, वनरक्षक भूपेश तांबोळी, लक्ष्मण पवार, अनिल वळवी, कल्पेश अहिरे, रामदास पावरा, सतीश पदमर, ईलान गावित, तुषार नांद्रे, वनमजूर बाळा गावित, जेऊ गावित, दिलीप गावित, सुदाम गावित, पांडू गावित, वाहन चालक दीपक विभांडीक, रवी गिरासे यांच्या पथकाने केली.
सदर कार्यवाही वनसंरक्षक विवेक होशिंग, उपवनसंरक्षक कृष्णा भवर, विभागीय वनाधिकारी दक्षता संजय पाटील, सहाय्यक वनसंरक्षक धनंजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पुढील तपास वनक्षेत्रपाल मंगेश चौधरी करीत आहेत.