तळोद्यातील घरकुलांचा प्रश्न न सुटल्यास अन्नत्याग

पं.स.सदस्य विजयसिंग राणा यांचा पत्रकार परिषदेत इशारा
तळोद्यातील घरकुलांचा प्रश्न न सुटल्यास अन्नत्याग

मोदलपाडा Modalpada/सोमावल । वार्ताहर -

केंद्र सरकारच्या (Central Government) ग्रामीण भागात घरकुलाच्या (Gharkula) जाचक निकषांमुळे (Critical criteria) ग्रामीण भागातील गरिबांना घरकुलाचा लाभ मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील सर्वसामान्यांना घरकुलाच्या लाभापासून (Benefits) वंचित राहण्याची वेळ आली आहे. याबाबत आठ दिवसात निर्णय न झाल्यास अन्नत्याग आंदोलन (hunger strike) करण्यात येईल, असा इशारा पं.स.सदस्य विजयसिंग राणा (Vijay Singh Rana) यांनी तळोदा येथे पत्रकार परिषदेत दिला.

श्री.राणा म्हणाले, घरकुलाच्या (Gharkula) लाभार्थ्यांना ड वर्ग यादीतील नागरिकांना हेलपाटे पंचायत समिती व ग्रामसेवक यांच्याकडे मारावे लागत आहेत. काहीवेळा लाभार्थी व प्रशासकीय काम करणार्‍या कर्मचार्‍यांमध्ये घरकुलाचे प्रकरण मंजूर (Case approved) करण्यासाठी वादविवाद होऊन खटकेसुद्धा उडत आहेत.

यावर वेळीच शासनाने तोडगा काढला नाही तर ग्रामीण भागातील (rural areas) जनतेच्या असंतोषाला सामोरे जाण्याची वेळ त्यांनी यावेळी बोलून दाखविली. पंचायत समिती (Panchayat Samiti) तळोदा येथे व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा (Rural Development System) यांच्या कार्यालयात 1148 प्रकरणे प्रलंबित आहेत. परंतु हे लाभार्थी आपले प्रकरण मंजूर करून घेण्यासाठी सरपंच, ग्रामसेवक, पंचायत समिती यांच्याकडे हेलपाटे मारत आहेत. घरकुलाच्या प्रश्नाबाबत पंचायत समितीच्या मासिक सभेतसुद्धा (monthly meeting) विषय मांडला होता. यावर सर्व सदस्यांनी एकमताने या विषयाला मंजूरी देण्यात आली. तसा ठराव देखील करण्यात आला आहे. येत्या आठ ते दहा दिवसांत याबाबत निर्णय घेतला नाही तर आंदोलन छेडून अन्नत्याग (hunger strike) करण्याचा इशारा दिला आहे.

निकष जाचक

घरकुलाच्या (Gharkula) निकषांमध्ये लँडलाईन फोन, फ्रीज, दुचाकी वाहन, कृषी उपकरणामध्ये यांत्रिकी तीन व चार चाकी वाहन अर्जदाराचे दहा हजारापेक्षा जास्त उत्पन्न याबाबी असल्यास त्यांना घरकुलाचा लाभ मिळत नाही. परंतु फ्रीज व मोटरसायकल आजच्या काळात अत्यावश्यक गरज झाली आहे. वार्षिक दहा हजार रुपयेपेक्षा जास्त उत्पन्न सध्या मजूर वर्गाचे आहे. असे निकष घरकुलाच्या (Gharkula) मंजूरीसाठी व्यवहार्य आहेत काय? असा ही प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. भाजपाचे तत्व शेवटच्या माणसांचा विकास साधण्याचे आहे. येत्या काही काळात घरकुलाच्या निकषांमध्ये(Critical criteria) केंद्र सरकारच्या ग्रामीण विकास यंत्रणेकडून (Rural Development System) शिथिलता आणण्यात आली नाही तर गरिबांना व सर्वसामान्यांना हक्काचे घर मिळून देण्यासाठी मी स्वतः अन्नत्याग करेल. तसेच ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल असे ही श्री राणा यांनी यावेळी सांगितले. यावेळी दीपक जाधव, रवींद्र भिलाव, विनोद शेवाळे उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com