पतीने पत्नीच्या डोक्यात लोखंडी कुस्सा मारून केले ठार, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पतीने पत्नीच्या डोक्यात लोखंडी कुस्सा मारून केले ठार, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

नंदूरबार Nandurbar l प्रतिनिधी

राणीपुर, ता.शहादा येथे पत्नीकडून (wife) पैसे (Money) मागण्याच्या कारणावरून दोघात भांडण (Quarrel) झाल्याने पतीने (Husband) पत्नीच्या डोक्यात लोखंडी कुस्सा मारून (iron fist) राहत्या घरात गंभीर जखमी करून जीवे ठार (Killed) मारल्याची घटना घडली आहे. याबाबत म्हसावद पोलीसात (Mhaswad police) पतीविरोधात खुनाचा गुन्हा (crime of murder) दाखल करण्यात आला असून संशयित आरोपी पतीला अटक करण्यात आली आहे.

याबाबत पोलीस सुत्रानुसार माहीती अशी की, मंगळवारी पहाटे पाच वाजे पूर्वी राणीपुर ता. शहादा येथे मुन्ना जुगला पावरा (Munna jugala pavara) (28) याने त्याची पत्नी रमीला (Ramila) (28) हिच्याकडून पैसे मागीतले (Asked for money) या कारणावरून दोघा पती-पत्नी जोरदार भांडण (Quarrel) झाले.

यात मुन्ना याने रमीलाच्या डोक्यात लोखंडी कुश्श्याने मारून गंभीर जखमी केले.यात रमीलाचा जागीच मृत्यू (Death) झाला. याबाबत म्हसावद पोलीसात संजय रोहीदास पटले रा.तुळाजा, ता.तळोदा यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार भादंवी कलम 302 प्रमाणे खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपी पतीला अटक (Accused husband arrested) करण्यात आली आहे. राणीपूर गावात तणावाचे वातावरण झाले.म्हसावद पोलीसांची दंगा नियंत्रण पथक गाडीसह पोलीस कर्मचारी बंदोबस्त ठेवला आहे. गावात तणावपुर्ण शांतता आहे. घटनास्थळी शहादा उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे,म्हसावदचे पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार, तळोदाचे पोलीस निरीक्षक केलसिंग पावरा यांनी भेट दिली.

Related Stories

No stories found.