भुजगाव येथे आगीत घर जळून खाक

भुजगाव येथे आगीत घर जळून खाक

मोलगी molgi। वार्ताहर-

धडगाव तालुक्यातील भुजगाव (Bhujgaon) गावातील येथील सुनिल पेचरा पाडवी यांच्या घराला आग (house on fire) लागून संपूर्ण घर जळून खाक (burn up) झाल्याची घटना घडली आहे.

सुनिल पेचरा पाडवी यांचे संपूर्ण कुटुंब बाहेर गेलेले असतांना घरात कोणी नसतांना सदर घटना घडली. घराला लागलेल्या आगीत जीवनावश्यक वस्तू, धान्य, महत्वाची कागदपत्रे आणि कपडेलत्ते जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. परंतू प्रत्यक्षदर्शनी दिलेल्या माहितीनुसार रात्री 8 वाजेच्या सुमारास अंधारात आगीचे लोट उठल्याने आजूबाजूच्या नागरिकांना दिसून आल्यानंतर जवळपासच्या नागरिकांनी आग विझविण्यासाठी मिळेल त्या भांड्यांमध्ये पाणी आणून आग विझविण्याचा प्रयत्न केला.

परंतू सुनिल पेचरा पाडवी यांचे घर टेकडीवर असल्याने वार्‍यामुळे आगीने संपूर्ण घर भस्मसात झाल्याने आगीवर नियंत्रण मिळविणे कठीण झाले होते. धडगाव नगरपंचायतीच्या अग्निशामक दलाला संपर्क केल्याने तात्काळ अग्निशमकदलाची दाखल होत संपूर्ण आग विझवली तोपर्यंत घरातील जीवनावश्यक वस्तू धान्य, घराच्या लाकूडसह जळून खाक झाल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे. सुनिल पेचरा पाडवी या गरीब परिवाराच्या घराला आग लागून उभा संसार काही मिनिटातच जळून राख झाला आहे. अंगावरच्या कपडयाव्यतिरिक्त काहीही वाचलेले नाही. महसूल विभागाच्या वतीने सदर आगीमुळे नुकसान झालेल्यांना पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

रात्री 8 वाजेच्या सुमारास घटना घडल्याचे समजताच नगरपंचायतीच्या अग्निशमनदलाला संपर्क करून बोलावण्यात आले परंतू तोपर्यंत पूर्ण घर आणि जीवनावश्यक वस्तू जळून खाक झाले. त्यामुळे कुटुंब उघड्यावर आले असून सामाजबांधवानी सढळ हातानी मदत करावी.

- सरपंच अर्जुन पावरा ग्रामपंचायत भूजगाव

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com