समृद्ध गाव स्पर्धेतील विजेत्या गावांचा सन्मान

समृद्ध गाव स्पर्धेतील विजेत्या गावांचा सन्मान

नंदुरबार Nndhurbar। प्रतिनिधी

पाणी फाऊंडेशन Water Foundation आयोजित सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धा-2020-2022 Satyamev wins prosperous village competition च्या पहिल्या टप्प्यात चांगली कामगिरी करणार्‍या Respect for the villages जिल्हाधिकारी मनीषा खत्री Collector Manisha Khatriयांच्या हस्ते करण्यात आला.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला उपजिल्हाधिकारी शाहूराज मोरे, पाणी फाऊंडेशनचे विभागीय समन्वयक सुखदेव भोसले, कृषि तंत्रज्ञाना केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ राजेंद्र दहातोंडे, उमेद अभियानाचे किशोर जगदाळे आदी उपस्थित होते.

समृद्ध गाव स्पर्धेस चांगला प्रतिसाद मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त करून श्रीमती खत्री म्हणाल्या, जलसंधारणाचे काम केवळ स्पर्धेपुरते मर्यादीत न ठेवता गावाच्या विकासासाठी त्यात निरंतरता ठेवावी. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून जलसंधारणाची कामे घेण्यात यावी. विहीर पुनर्भरणासारखे उपक्रम हाती घेण्यात यावे. या कामांमुळे शेतकर्‍यांना आणि एकूणच गावाला फायदा होण्यासोबत गावातील वातावरणही सकारात्मक होते. स्पर्धेत सहभागी होणार्‍या गावांनी गाव समृद्ध करण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवावे, असे आवाहन त्यांनी केले.

श्री.मोरे म्हणाले, समृद्ध गाव स्पर्धेच्या माध्यमातून मृदा संधारण, जलसंधारण आणि वायू प्रदूषण कमी करण्याचे काम होत असल्याने या स्पर्धेतील सहभाग महत्वाचा आहे. वृक्षारोपणामुळे गावाला फायदा होणार आहे. रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून जलसंधारणाची चांगली कामे करता येतील.

जिल्हाधिकार्‍यांच्या हस्ते स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात चांगली कामगिरी करणार्‍या दामळदा, लंगडी भवानी, लोंढरे, अंबापूर, फेस, हिंगणी, गोगापूर, कोळपांढरी, कवठळ त.श., भुलाणे, पाडळदा बु., नागझिरी, वीरपूर, नवानगर, कलसाडी, मानमोड्या, काकर्दे खु., जवखेडा, धांद्रे खु. कानडी त.श. या गावांचा स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन पुरस्कृत करण्यत आले. बामखेडा त.त., जाम, जयनगर आणि आडगावला उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. जलमंदिर, ग्रीकल्चर टीम आणि उज्वला पाटील यांनाही त्यांच्या योगदानाबद्दल प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.कार्यक्रमाला कृषि सहायक, तलाठी, ग्रामसेवक, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com