वसतीगृहातील अधीक्षकांच्या मनमानीविरुद्ध शहादा तहसिलवर विद्यार्थ्यांचे धरणे
शहादा Shahada । का.प्र. -
तालुक्यातील मोहिदा त.श. येथील शासकीय आदिवासी वस्तीगृहाच्या (Government Tribal Hostel) विद्यार्थ्यांनी (students) अधीक्षकांच्या (superintendent) मनमानी कारभाराविरोधात (Against arbitrariness) तहसील कार्यालयावर धरणे (hold on to tehsil office) आंदोलन केले.
तालुक्यातील मोहिदे त.श.येथील आदिवासी विकास विभागाच्या शासकीय वस्तीगृहातील विद्यार्थ्यांनी आज वस्तीगृहातील समस्या व अधिक्षकाच्या मनमानी कारभाराविरोधात आंदोलन केले. आज सर्व विद्यार्थ्यांनी तहसिलदार कार्यालयाबाहेर ठिय्या मांडत अधिक्षक आणि वस्तीगृहातील समस्यांबाबत जोरदार घोषणाबाजी केली.
वस्तीगृहातील पाण्याची मोठी समस्या असून यामुळे खानावळीत देखील अन्न शिजवले जात नसल्याने उपाशी पोटी जगायचे कसे असा प्रश्न करत याबाबत अधिक्षक काहीही ऐकुन घेण्यास तयार नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. अधिक्षक हे मद्यपान करुन वस्तीगृह परिसरात येतात समस्या मांडण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना शिवीगाळ करत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी यावेळी केला.
पुढील पाच दिवसात याबाबत योग्य कारवाई झाली नाही तर व्यापक आंदोलनाचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे.विशेष म्हणजे वस्तीगृह अधिक्षकांचा मद्यधुंद अवस्थेतील एक व्हीडीओ विद्यार्थ्यांकडुन जारी करण्यात आल्याने या सार्याप्रकाराबाबत आदिवासी विकास विभागाने साधलेल्या चुप्पी बाबत टिका देखील होत आहे.
वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे, पाण्याच्या समस्येमुळे वेळेवर जेवण मिळत नाही, तसेच वस्तीग्रहात कायम अस्वच्छता असते, अस्वच्छतेमुळे आजारी विद्यार्थ्यांकडे प्रशासनाचे पूर्णतः दुर्लक्ष असते, आदी मागण्या करीत आज शेकडो विद्यार्थ्यांनी शहादा तहसील कार्यालयावर धरणे आंदोलन केले.
पुढील पाच दिवसात एकात्मिक आदिवासी प्रकल्प अधिकार्यांनी विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवल्या नाही तर तालुका व जिल्हा स्तरावर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने विद्यार्थ्यांनी दिला आहे. यावेळी शहादा शहरमंत्री स्वरुप कुंकड, राजेंद्र निकम, आकाश पटले आदी उपस्थित होते