तळोदा तालुक्यात वादळी पाऊस

पुराच्या पाण्यात दुचाकी व पिकअप व्हॅन वाहून गेल्याने नुकसान
तळोदा तालुक्यात वादळी पाऊस

नंदुरबार | प्रतिनिधी NANDURBAR

सातपुडयाच्या पायथ्याशी काल रात्रीच्या सुमारास झालेल्या (Heavy rain) जोरदार पावसामुळे नदीला आलेल्या पुरात (Pickup vehicle) पिकअप वाहन, (Motorcycle) मोटरसायकल व शेतीपयोगी पाईप वाहून गेल्याची घटना घडली.

तळोदा तालुक्यात वादळी पाऊस
नंदुरबारात ११ तलवारी जप्त

जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. काल रात्रीच्या सुमारास सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या तळोदा तालुक्यातील टाकली, घोडमाग, अक्राणी, केलापाणी, थेवापाणी, सीतापावली, बंधारा, राणीपूर, जमोणीपाडा, तोलाचापाडा, वरपाडा, कोठार, सावरपाडा या गावांमध्ये तासभर वादळी वार्‍यासह दमदार पाऊस झाला.

या पहिल्याच पावसामुळे सातपुडयातील नदीनाल्यांना पहिल्याच पूर आला होता. पुराच्या पाण्यात घोडमाग येथील रहिवासी कांतीलाल पटले यांची दुचाकी वाहन व गायमुख येथील चालक मिथून यांचे पिकअप वाहन पुरामध्ये वाहून गेल्याने वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

अचानक पुराचा प्रवाह आल्याने वाहने सोडून चालक नदी बाहेर पळाल्याने जिवीतहानी टळली. यासोबत नदीकिनारी असलेल्या शेतीपंपाचे पाईप वाहून गेले आहे.

वादळी वार्‍यासह झालेल्या पावसामुळे परिसरात अनेक ठिकाणी विद्युत तारा बाधित झाल्याने वीज प्रवाह खंडित करण्यात आला. पाऊस व पुरामुळे डोंगरदर्‍यातील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे.

सातपुड्याच्या पायथ्याशी अनेक गावांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेती कामांना सुरुवात होणार आहे. मात्र जिल्ह्यातील नवापूर, शहादा, नंदुरबार, अक्कलकुवा, धडगाव तालुक्यांमध्ये अद्याप पाऊस झालेला नाही.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com