नावली येथे एक लाखासाठी विवाहितेचा छळ
नंदुरबार nandurbar । प्रतिनिधी
नवापूर तालुक्यातील नावली येथील विवाहितेने (married) माहेरहून एक लाख रुपये आणावेत यासाठी तिचा छळ (torture) केल्याप्रकरणी सासरच्या तिघांविरोधात (Crime against three in-laws) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नवापूर तालुक्यातील नावली येथील पुजा धंजी जगताप यांचा विवाह साक्री तालुक्याचील पाचमौली येथील धंजी अशोक जगताप याच्याशी झाला होता.
मात्र विवाहानंतर माहेरहून एक लाख रुपये आणावेत यासाठी धंनजी अशोक जगताप, अशोक फुलसिंग जगताप, नबीबाई अशोक जगताप यांनी विवाहितेस शिवीगाळ करीत मानसिक त्रास देत छळ केला.
याबाबत पुजा जगताप यांच्या फिर्यादीवरुन विसरवाडी पोलिस ठाण्यात सासरच्या तिघांविरोधात भादंवि कलम 498 (अ), 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.सुरेश मोरे करीत आहेत.