नंदुरबार तालुक्यात वादळी पावसासह गारपिट

नंदुरबार तालुक्यात वादळी पावसासह गारपिट

नंदुरबार - Nandurbar - वार्ताहर :

नंदुरबार तालुक्यात आज सायंकाळी वादळी पावसासह गारपिट झाली. त्यामुळे पपई, बाजरी, गहू, हरभरा आदी पिकांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे.

नंदुरबार जिल्हयात या आठवडयात अवकाळी पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता.

गेल्या आठवडयापासून शहरात ढगाळ वातावरण आहे. चार दिवसांपुर्वी गारपीटही झाली. दरम्यान, आज सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास पुन्हा तालुक्यातील वावद, उमर्दे, चोपाळे, शनिमांडळ आदी परिसरात वादळी वार्‍यासह पाऊस झाला.

काही ठिकाणी गारपीटही झाली. या अवकाळी पावसामुळे पपई, बाजरी, गहू, हरभरा, मिरची आदी पिकांचे नुकसान झाले आहे.

पपईची झाडे उन्मळून पडली आहेत. आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकर्‍यावर अस्मानी संकट ओढावल्याने शेतकरी हतबल झाला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com