तळोदा येथे पावणे दोन लाखांचा गुटखा जप्त

बंदी असलेल्या गुटख्याची सर्रास वाहतूक
तळोदा येथे पावणे दोन लाखांचा गुटखा जप्त

तळोदा Taloda । ता.प्र.-

शहराबाहेरील रस्त्यावर 1 लाख 87 हजार 410 रुपये किमतीचा गुटखा जप्त (Confiscation of Gutkha) करण्यात आला आहे. या गुटख्याला महाराष्ट्रात बंदी (Banned in Maharashtra) असतांनाही विक्री (sell) करण्याच्या दृष्टीने वाहतूक (Transportation) केला जात होता. याबाबत तळोदा पोलीस ठाण्यात (Taloda Police Station)गुन्हा दाखल ()Filed a caseकरण्यात आला आहे. अ‍ॅपेरिक्षा रिक्षासह 2 लाख 87 हजार 410 रूपयांचा मुद्देमाल तळोदा पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

तळोदा येथे पावणे दोन लाखांचा गुटखा जप्त
पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे संतप्त; बैठकीतून घेतला काढता पाय

तळोदा गावाबाहेरील रस्त्यावर गायत्री वॉटर फिल्टरजवळ अन्सारी शब्बीर अहमद मोहम्मद तैय्यब (वय 41, रा.हाफीज सिद्दिकीनगर धुळे) हा दि.7 रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास आपल्या ताब्यातील अ‍ॅपेरिक्षा (क्र.एम.एच.15 ईजी 748) मध्ये यात महाराष्ट्रात प्रतिबंधीत विमल गुटखा, पान मसाला, तंबाखूची अवैधरित्या विक्री करण्याचा उद्देशाने चोरटी वाहतूक करताना आढळून आला.

सदर मुद्देमाल हा मानवी आरोग्यास हानीकारक असल्याचे माहित असताना कब्जात बाळगताना मिळून आला. म्हणून तळोदा पोलीसात भादंवि कलम 328, 188, 273 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर इसमाजवळ दोन खाकी रंगाच्या गोणीत 77 हजार 792 रुपये किमतीचे 416 विमल पान मसाला, 27 हजार 456 रुपये किमतीचे प्लास्टिक पोत्यात 208 पाऊच, तानसेन प्लेवड पान मसाला प्रत्येकी किंमत 2000 रूपयेप्रमाणे 35 पाऊच एकुण किंमत 7000 रूपये, हिरा पान मसाला किंमत 120 रूपये प्रमाणे 60 पाऊच एकुण किंमत 7200 रूपये, महा रॉयल तंबाखू किंमत 30 रुपये प्रमाणे 60 पाऊच एकुण किंमत 1800 रूपये, विमल पान मसाला प्रत्येकी किंमत 120 रूपये प्रमाणे 52 पाऊच किंमत 6240 रुपये, व्ही वन प्रत्येकी किंमत 22 रुपये 220 पाऊच किंमत 4840 रुपये, प्रिमीयम एक्स एल 01 जाफरानी जर्दा 30 रुपये प्रमाणे 208 पाऊच एकुण किंमत 6240 रुपये, प्रिमियम जर्दा किंमत 50 रुपये प्रमाणे 37 पाऊच एकुण किंमत 1850 रुपये, व्ही-1 तंबाखू 33 रूपये प्रमाणे 416 पाऊच एकुण किंमत 3432 रुपये, विमल पान मसाला प्रत्येकी किंमत 198 रुपये प्रमाणे 220 पाऊच एकुण किंमत 43 हजार 560 रूपये, सोबत प्याजो अ‍ॅपे रिक्षा किंमत 1 लाख रुपये असा एकूण 2 लाख 87 हजार 410 रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला.

तळोदा येथे पावणे दोन लाखांचा गुटखा जप्त
Visual Story # क्रितीचा ‘ठुमकेश्वरी’ अंदाज पाहिलात का?

पुढील तपास पोलीस निरीक्षक पंडीतराव सोनवणे यांच्या आदेशानुसार पोहेकॉ सुधीर गायकवाड यांच्याकडे सोपविण्यात आला. पिंटु अहिरे, तपास अधिकारी सपोनि अविनाश केदार हे मदत करत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com