खापर येथे १२ लाखाचा गुटखा जप्त

अक्कलकुवा पोलीस व अन्न, औषध प्रशासनाची कारवाई
खापर येथे १२ लाखाचा गुटखा जप्त

खापर | वार्ताहर- KHAPAR

महाराष्ट्रात प्रतिबंधीत असलेला १२ लाख ११ हजार रुपयेे किमतीचा गुटखा अक्कलकुवा पोलिस व अन्न व औषध प्रशासन यांच्या संयुक्त पथकाने जप्त केला. वाहनासह सुमारे २५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी नागपूर येथील एकास अटक करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, आज दि.७ सप्टेंबर २०२२ रोजी गोपनीय माहितीच्या आधारे हॉटेल खेतेश्वरजवळ, अंकलेश्वर-बुर्‍हाणपूर महामार्गावर खापर गावानजिक टाटा कंपनीचे वाहन क्रमांक (एमएच४० एन २७२७) ची तपासणी केली असता

महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेले सुगंधित तंबाखू - बब्बू गोल्ड व गोल्डन युग यांचे ९ हजार ७५० पॅकेट्स आढळून आले. या गुटख्याची किंमत १२ लाख ११ हजार रुपये आहे. वाहनाची किंमत १३ लाख असून एकूण २५ लाख ११ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याबाबत राजकुमार रामकरण यादव (वय ४२ वर्ष रा.वाडी, नागपूर) यास अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी आ. भा. पवार यांनी फिर्याद दिली असून अक्कलकुवा पोलिस स्टेशन येथे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सदर कारवाई पोलिस अधीक्षक पी.आर.पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार, उपविभागीय पोलिस अधिकारी संभाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ए. एस.आगरकर, पोलिस उपनिरीक्षक रितेश राऊत, पो.ना.कपिल बोरसे,

पो.ना.देविदास विसपुते, पो. ना.किशोर वळवी, पो.ना.खुशाल माळी, पो.ना.अजय पवार, पो.शि.आदिनाथ गोसावी, पो.शि. गिरीश सांगळे व अन्न व औषध प्रशासन नंदुरबार चे सहायक आयुक्त सं. कृ. कांबळे, अन्न सुरक्षा अधिकारी आ. भा. पवार, लिपिक समाधान बारी यांनी केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com