Photos # महामानवास जिल्हाभरातून अभिवादन

ठिकठिकाणी शोभायात्रा, मोटरसायकल रॅली, मिरवणुका, प्रतिमापूजन,रक्तदान शिबीर
Photos # महामानवास जिल्हाभरातून अभिवादन

नंदुरबार Nandurbar

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या 131 व्या जयंती (Anniversary) दिनानिमित्त शहरासह जिल्ह्यात विवीध सामाजिक संस्था, राजकीय पक्ष, व संघटनांच्या वतीने अभिवादानासह (Greetings) प्रतिमा पूजन, ठिकठिकाणी मिरवणूक (Procession) तसेच रॅली काढण्यात आली. 14 एप्रिलनिमित्त संपूर्ण शहरात निळ्यारंगाचे ध्वज, पताका लावण्यात आल्याने शहरात निळ्या वादळाचे उधाण आल्याचे दृश्य दिसून आले. दिवसभर कार्यक्रमात बालके व महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.

नंदुरबार येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त डॉ.आंबेडकर पुतळयाजवळ सकाळी 9 वाजता सामूहिक बुध्दवंदना (Collective Buddhism) करण्यात आले. यावेळी डॉ.बाबासाहेब यांच्या पुतळयाला खा.डॉ.हिना गावीत, आ.डॉ.विजयकुमार गावीत, मा.आ.चंद्रकांत रघुवंशी नगराध्यक्षा सौ.रत्नाताई रघुवंशी, भाजपाचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी,राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे, माजी आ शिरीष चौधरी, उपनगराध्यक्ष कुणाल वसावेे, रसिकलाल पेंढारकर, अरुण रामराजे काँग्रेसचे कार्याध्यक्ष दिलीप नाईक, अश्विनी जोशी नितीन जगताप मधुकर पाटील राजेंद्र पाटील यांनी पुतळयास अभिवादन केले.यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनमित्त साक्री नाका परिसरात विशाल फाउंडेशन, अस्मिता फाउंडेशन व दलाई नामा फाउंडेशनतर्फे मोफत पाणी बॉटल वाटप करण्यात आली. यावेळी अश्विनी घोडरे, सुजाता अहिरे ,श्रीकांत अमृतसागर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी नायब तहसिलदार रामजी राठोड, यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

भारतीय किसान सेना

नंदुरबार येथे भारतीय किसान सेना व भिलीस्थान लायन सेनेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली .डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती निमित्त भारतीय किसान सेना व भिलीस्थान लायन सेनेतर्फे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी भारतीय किसान सेनेचे प्रदेश महासचिव पंडित तडवी, भारतीय किसान सेनेचे जिल्हाध्यक्ष उदेसिंग पाडवी,शहराध्यक्ष राजेश माळी,भटके विमुक्त सेलचे जिल्हाध्यक्ष कांतीलाल जाधव ,जिल्हा उपाध्यक्ष अंकित वळवी, तालुकाध्यक्ष बिंदास गावित ,रिवदास वळवी,सुधाकर भिल पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

नंदुरबार येथे अन्नदान वाटप

भारतरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नंदुरबार येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर युवा मंच, गिरीविहार गेट यांच्या तर्फे अन्नदान वाटप करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे व्यापार व उद्योग सेलचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.राऊ मोरे, उपनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नरेंद्र भदाणे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष लल्ला पहेलवान, डॉ.बाबासाहेब आंबेडकर युवा मंचचे धनराज शिरसाठ, गणेश बागले, किशोर भालेराव, दिपक सोनवणे, गोपाल शिंदे, अक्षय भालेराव, अर्जुन शिंदे, विजय खताडे, अनिल जावरे आदी उपस्थित होते.

एस.ए.मिशन हायस्कुल नंदुरबार

नंदुरबार-डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर येथील युवारंग फाउंडेशनतर्फे एस.ए.मिशन हायस्कुल, नंदुरबार येथे सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपमुख्याध्यापक व्ही.आर.पवार हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून शहर पोलीस स्टेशन एपीआय महेश माळी, पीएसआय प्रविण पाटील, तसेच उपशिक्षक गुलाब राठोड, चंद्रशेखर चौधरी, युवारंग फाउंडेशनचे अध्यक्ष जितेंद्र लुळे, सचिव राहुल शिंदे, उपाध्यक्ष देवेंद्र कासार ऋषिकेश मंडलिक, भावेश मंडलिक आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमचे पुजन मान्यवराच्या हस्ते करण्यात आले. यानंतर स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिस वितरण कार्यक्रम झाला. या सामान्य ज्ञान स्पर्धेत लहान गटात प्रथम श्रृती संजय वाठोरे (एस.एस.मिशन हायस्कुल), द्वितीय मनिषा सेवा पावरा (एस.ए.मिशन हायस्कुल) तर तृतीय दिक्षा राहुल भोये (पीजी पब्लिक स्कुल) तसेच मोठ्या गटात संजना गणेश नरभवर (डॉ.काणे गर्ल्स हायस्कुल), द्वितीय वैष्णवी राजेश रामोळे (कमला नेहरु विद्यालय), तर तृतीय संजना संतोष वाघ (एस.ए. मिशन हायस्कुल) यांनी यश संपादन केले. मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. तसेच प्रा.नुतनवर्षा वळवी, युवराज भामरे यांचे मार्गदर्शन लाभले. सामान्यज्ञान स्पर्धेचे कनिष्ठ पर्यवेक्षक म्हणून रोहित वाडीले, हितेश गुरव, सौरभ पाटील, सुनिल ठाकरे, भटू पाटील, प्रदीप जाधव यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल शिंदे यांनी केले तर आभार जिेतेंद्र लुळे यांनी मानले.

पी. के. पाटील माध्यमिक विद्यालय

हिरा प्रतिष्ठान संचलित, सहकार महर्षी श्नी. अण्णासाहेब पी. के. पाटील माध्यमिक विद्यालय नंदुरबार .येथे शाळेचे मुख्यध्यापक महेंद्र फटकाळ यांच्या शुभ हस्ते प्रतिमेस पुष्षहार अर्पण करून पुजन करण्यात आले. कार्यक्रमास शाळेतील सर्व शिक्षक व ज्युनिअर कॉलेजचे प्रा. गणेश पवार , चेतना चौधरी , अनिल चौधरी विश्वास गायकवाड , सुधाकर सुर्यवंशी, छाया मोरे ,उज्ज्वला चौरे ,नितीन साळी, अमोल भदाणे , प्रा.हितेश चव्हाण , प्रा. निमखेडकर , प्रा. विशाल साळवे ,प्रा. रेखा कुवर शिक्षकेत्तर कर्मचारी जितेंद्र चौधरी, रविंद्र चौधरी, शेखर पाटील यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्नम घेतले.

डी. आर. हायस्कूल नंदुरबार

नंदुरबार येथील श्रीमती डी. आर. हायस्कूल मध्ये भारतरत्न महामानव प्रज्ञासूर्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर व क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक नारायण भदाणे तसेच प्रमुख वक्ते म्हणून डॉ.उमेश शिंदे व योगेश गवते हे होते. तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून शाळेचे उपमुख्याध्यापक एस.व्ही.चौधरी, पर्यवेक्षक पंकज पाठक, श्रीराम मोडक आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून करण्यात आली.कार्यक्रमास डी. आर. कनिष्ठ महाविद्यालय व हायस्कूलचे सर्व शिक्षक,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक हेमंत खैरनार यांनी तर आभार दिनेश वाडेकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच उत्सव समिती सदस्य यांनी योगदान दिले .

आष्टे येथे सामुदायीक बुध्दवंदना

नंदुरबार तालुक्यातील आष्टे येथे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीदिनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून बुद्ध वंदना घेण्यात आली. कार्यक्रमास जि.प.सदस्य.देवमन पवार.पचायत समितीचे उपसभापती कमलेश महाले ,.वैद्यकीय अधिकारी डॉ. देविदास चौधरी. ग्राम विकास अधिकारी देवेंद्र सिंह राजपूत.दत्तात्रय आघाव बाबूलाल पिंपळे.रामकृष्ण पाटील. लोटन पिंपळे.सोमा ढोडरे. शिवदास पिंपळे.देविदास पिंपळे. गणेश अहिरे.देवेंद्र आघाव.रतन पाटील.राजेंद्र पिंपळे.सतिश पिंपळे.हिरालाल पिंपळे.मुकेश पिंपळे. प्रभाकर पिंपळे. रमणलाल पिंपळे.सिध्दार्थ पिंपळे. निखिल सामद्रे.शंकर पिंपळे. जय प्रकाश पानपाटील. जयभीम पिंपळे. गौतम पिंपळे. सचिन पिंपळे. सचिन पिंपळे.सतीश पिंपळे. मनिष पिंपळे. भुषण पिंपळे.बुद्धवंदना त्रिशरण शरद पिंपळे यांनी घेतली.सुत्रसंचालन व आभार नारायण ढोडरे यांनी मानले. कार्यक्रमास पंचशील मित्र मंडळाचे पदाधिकारी ग्रामस्थ व समाज बांधव उपस्थित होते.

मॉडर्न इंग्लिश स्कुल बोरद

मॉडर्न इंग्लिश स्कुल व ज्युनियर कॉलेज बोरद येथे भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमचे अध्यक्ष म्हणून शाळेचे प्राचार्य निलेश सूर्यवंशी हे होते. तर शाळेचे पर्यवेक्षक.भटू पवार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आपल्या जीवनात आचरणात आणावे व त्यांचा आदर्श घ्यावा असे आपल्या मनोगतात सांगितले. सूत्रसंचालन हर्षल कलाल यांनी केले तर प्रस्ताविक जयपाल गिरासे यांनी केले.या वेळी उपस्थित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी बाबासाहेबांना अभिवादन केले. या वेळी प्राचार्य निलेश सूर्यवंशी,पर्यवेक्षक भटू पवार, प्राध्यापक सुभाष पाडवी,उपशिक्षक जयपाल गिरासे,हर्षल कलाल,अरुण कोळी,विजय अहिरे,शिक्षकेतर कर्मचार्‍यांमध्ये वरिष्ठ लिपिक हेमकांत राठोड,दिपक गोसावी, अरुण वळवी,मोहन नाईक हे उपस्थित होते. शेवटी आभार सुभाष पाडवी यांनी मानले.

जि.प. शाळा नं.1 व 2 बोरद

जि.प. शाळा नं.1 व 2 बोरद येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमावेळी

पंचायत समिति सदस्य विजय राणा, शाळा व्य.समिति अध्यक्ष प्रकाश ठाकरे ,सदस्य मंगेश पाटील, दयानंद चव्हाण, कन्हैयालाल ढोडरे, बोरद नं 1 चे पदोन्नती मुख्याध्यापक रऊफ शाह,नं 2 चे पदोन्नती मुख्याध्यापक यशवंत मोठे , सहकारी शिक्षक बकतसिंग गिरासे ,राजेंद्र सोमवंशी , भगतसिंग वळवी , जलमसिंग वळवी ,सतिष पाटील ,जोतिराम डोणे , दादाजी वळवी , वसंत पराडके , वंदना पाटील , कमल पाटील ,कामिनी गोहिल ,अनिता बोळगावे तसेच विद्यार्थी उपस्थित होते .

धडगांव येथे प्रतिमा पुजन

धडगांव येथील महाराज ज.पो.वळवी कला वाणिज्य व श्री.वि.कृ.कुलकर्णी विज्ञान महाविद्यालयात विद्यार्थी विकास विभागातर्फे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त प्रतिमा पुजन करण्यात आले. तसेच या निमित्त त्यांच्या जीवन कार्यावर आधारित राज्यस्तरीय ऑनलाईन वस्तुनिष्ठ प्रश्नमंजुषा आयोजित करण्यात आली आहे.त्यात सहभागी व्हावे असे आवाहन प्राचार्य डॉ एच.एम.पाटील यांनी केले आहे.याप्रसंगी डॉ प्रा हरीभाऊ पवार रतीलाल पावरा ,पांडुरंग वळवी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन व आभार प्रकटन विद्यार्थी विकास सहाय्यक अधिकारी प्रा अनिल शिंदे यांनी केले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com