‘सामर्थ्य नंदुरबारचे’ विशेषांकाचे शानदार प्रकाशन

वर्धापन दिनानिमित्त देशदूतवर शुभेच्छांचा वर्षाव
‘सामर्थ्य नंदुरबारचे’ विशेषांकाचे शानदार प्रकाशन

नंदुरबार nandurbar प्रतिनिधी-

नंदुरबार येथील दैनिक देशदूतच्या (Daily deshdoot) रौप्य महोत्सवी वर्धापन (Silver jubilee anniversary) दिनानिमित्त जिल्हाभरातील विविध राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व इतर क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते ‘देशदूत’ च्या ‘सामर्थ्य नंदुरबारचे’ ('Samarthya Nandurbar) या विशेषांकाचे (Publication of Special Issue) शानदार प्रकाशन करण्यात आले.

येथील दैनिक देशदूतच्या नंदुरबार आवृत्तीचा रौप्य महोत्सवी वर्धापन दिन आज दि.28 फेब्रुवारी रोजी दिमाखात साजरा करण्यात आला. या रौप्य महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त देशदूतने ‘सामर्थ्य नंदुरबारचे’ हा आगळावेगळा विशेषांक प्रकाशित केला होता. जिल्हाभरातील दुर्लक्षीत परंतू सामर्थ्यवान व्यक्ती, संस्थांचा यात आढावा घेण्यात आला होता. या विशेषांकाचे जिल्हाभरात कौतूक करण्यात आले. रौप्य महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त येथील ज्येष्ठ नागरीक सभागृहात आज स्नेहमिलन सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी जिल्हाभरातील विविध मान्यवरांनी प्रत्यक्ष येवून तसेच दूरध्वनी, सोशल मीडियावर शुभेच्छा देवून देशदूतवरील प्रेम व्यक्त केले.

यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित, जि.प.उपाध्यक्ष सुहास नाईक, माजी जि.प.अध्यक्षा अ‍ॅड.सीमा वळवी, माजी मंत्री अ‍ॅड.पद्माकर वळवी, पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे, उद्योगपती मनोज रघुवंशी, उद्योगपती गिरीष रघुवंशी, अनिल पाटील, तळोद्याचे माजी नगराध्यक्ष भरत माळी, माजी नगरसेवक संजय माळी, मुख्याध्यापक तथा माजी नगरसेवक जितेंद्र सूर्यवंशी, माजी उपनगराध्यक्ष कुणाल वसावे, माजी जि.प.उपाध्यक्ष रामचंद्र पाटील, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक भरत जाधव, उपनिरीक्षक श्याम पाटील, प्राथमिक शिक्षणाधिकारी सतिष चौधरी, डॉ.राजेश कोळी, डॉ.कांतीलाल टाटीया, निखील तुरखिया, मनिषभाई शहा, श्रॉफ हायस्कुलच्या मुख्याध्यापिका सौ.सुषमा शहा, आदर्श विद्या मंदिरच्या मुख्याध्यापिका मिनाक्षी भदाणे, पंकज भदाणे, काणे प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.सुलभा महिरे, ज्येष्ठ पत्रकार सूर्यभान राजपूत, संदीप परदेशी, योगेश चौधरी, राजकुमार खानवाणी, संदिप चौधरी, यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

यावेळी देशदूतच्या विशेषांकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. देशदूतचे संपादक हेमंत अलोने यांनी मान्यवरांकडून शुभेच्छा स्विकारल्या. यावेळी वितरण व्यवस्थापक विजय महाजन, मुख्य उपसंपादक राकेश कलाल, जाहिरात प्रतिनिधी सुनील खेडकर, उपसंपादक महेश पाटील, विशाल पाठक, दिनेश वळवी आदी उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com