देहली प्रकल्पग्रस्तांना घसारापोटी २ कोटीचे अनुदान वाटप

आदिवासी विकास मंत्री ऍड.के.सी.पाडवी यांनी दूरध्वनीद्वारे साधला संवाद
देहली प्रकल्पग्रस्तांना घसारापोटी २ कोटीचे अनुदान वाटप

नंदुरबार | प्रतिनिधी- NANDURBAR

अंबाबारी ता.अक्कलकुवा गावातील देहली प्रकल्पात (Delhi project) गेलेल्या घरांच्या घसारापोटी अक्षय तृतीयेच्या (Akshay Tritiye) मुहूर्तावर ६९२ लाभार्थ्यांना २ कोटी ५ लाख ८० हजार २४७ रुपयांचे सानुग्रह अनुदान (Sanugrah Grant) धनादेशाद्वारे प्रकल्पग्रस्तांना (project victims) वाटप करण्यात आले.

गेल्या ४० वर्षापासून रखडत असलेल्या देहली प्रकल्पाच्या कामाला जानेवारी महिन्यात सुरुवात करण्यात आली होती. मात्र विविध प्रकारच्या समस्या (Problem) न सुटल्याने झालेले घळ भरणीचे अंतिम टप्प्यातील काम हे पुन्हा प्रकल्पग्रस्तांनी दि.२६ एप्रिल २०२२ रोजी बंद पाडले होते. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांकरिता (project victims) तातडीने बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली होती.

देहली प्रकल्पात गेलेल्या घरांच्या घसारापोटी सानुग्रह अनुदान (Sanugrah Grant) वाटप कार्यक्रम आंबाबारी गावातील जि.प.शाळेत संपन्न झाले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती रतन पाडवी तर प्रमुख पाहुणे म्हणून पं.स.अक्कलकुवा उपसभापती विजय पाडवी, जि.प.सदस्य सी.के.पाडवी, प्रताप वसावे, जितेंद्र पाडवी, पं.स.सदस्य नानसिग वळवी, आंबाबारी सरपंच चंदूलाल तडवी, गुलीउंबर सरपंच आनंद वसावे, खडकुणा सरपंच गुलाबसिंग वसावे, गव्हाळी सरपंच जगण वसावे, दरबारसिग पाडवी, गेबु वसावे, नारायण तडवी, सहाय्यक अभियंता श्रेणी १ किशोर पावरा, शाखा अभियंता विकास शिंदे, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक आर. आर. खर्चे, सेवादल कॉंग्रेस तालुका अध्यक्ष जेहरसिग वळवी, रवींद्र वसावे, राजेंद्र वळवी आदी उपस्थित होते.

प्रकल्पग्रस्तांनी यावेळी आपली कैफियत मान्यवरांच्या पुढे ठेवले व लवकरच शंभर टक्के लाभार्थ्यांना न्याय मिळेल ही अपेक्षादेखील केली आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा परिषदेचे (Zilla Parishad) समाजकल्याण सभापती रतन पाडवी (Social Welfare Chairman Ratan Padvi) यांनी सांगितले की,

देहली प्रकल्पाचे (Delhi project) काम हे प्रकल्पग्रस्तांचे योग्य पुनर्वसन व अन्य कारणांमुळे गेल्या ४० वर्षापासुन रखडलेले प्रश्न देहली प्रकल्पग्रस्तांच्या अनेक मागण्या अद्यापपर्यंत अपूर्ण राहिल्याने त्या आदिवासी विकास विभागाचे मंत्री ऍड.के.सी. पाडवी (Minister Adv. Padvi) यांच्या प्रयत्नांतून तात्काळ पूर्ण केले जाणार आहे.

लवकर जनसुविधेचे कामदेखील पूर्ण करण्यात येणार आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पाण्याची समस्या परिसरातील शेतकर्‍यांसाठी सुटणार आहे, शेती सुजलाम-सुफलाम होणार आहे. यासाठी लाभार्थ्यांनी व प्रशासनाचे आपला ताळमेळ बसवणे हे गरजेचे आहे.

प्रकल्पग्रस्त यांच्या घरांच्या घसारापोटी सानुग्रह अनुदान ६९२ लाभार्थ्यांना २ कोटी ५ लाख ८० हजार २४७ रुपयांचा धनादेश लाभार्थ्यांनह स्विकार करावा असे आवाहन केले. यावेळी प्रकल्पग्रस्त दाखला मिळण्याकरिता ६९२ लाभार्थ्यांना भूसंपादन मिळण्यासाठी नोटिसा बजावण्यात आल्या. यावेळी सहाय्यक अभियंता श्रेणी १ किशोर पावरा यांनी अहवाल सादर केला. जिल्हा परिषद सदस्य प्रताप वसावे यांनी सूत्रसंचलन केले. दरबारसिग पाडवी यांनी आभार मानले.

राज्याचे आदिवासी विकास मंत्री ऍड.के.सी. पाडवी यांनी देहली प्रकल्पात गेलेल्या घरांच्या घसारापोटी सानुग्रह अनुदानाबाबत झालेल्या बैठकीत दूरध्वनीवरून संपर्क साधून ६९२ लाभार्थ्यांनी २ कोटी ५ लाख ८० हजार २४७ रुपये स्विकार करावा अशी विनंती केली. ज्या लाभार्थ्यांना भूसंपादनाच्या, रहिवासाचा करिता प्लॉट, तात्पुरत्या स्वरूपात राहण्याची व्यवस्था, पाण्याची समस्या आदी व्यवस्था लवकरच पूर्ण करण्यात येईल आणि प्रकल्पाच्या कामाला गती देण्यास मदत करावी, अशी विनंती करत काम लवकरच पूर्ण करण्याची ग्वाही देखील दिली.

Related Stories

No stories found.