Photo# नंदुरबारात स्वराज्य महोत्सवांतर्गत भव्य रॅली

विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी दाखविली खेळांची प्रात्यक्षिके
Photo# नंदुरबारात स्वराज्य महोत्सवांतर्गत भव्य रॅली

नंदुरबार | प्रतिनिधी NANDURBAR

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत (Amrit Mahotsav) जिल्हा क्रीडा अधिकारी (District Sports Officer) कार्यालय व जिल्हा परिषद (zp) शिक्षण विभागाच्या वतीने आज स्वराज्य महोत्सवांतर्गत भव्य रॅलीचे (Rally) आयोजन करण्यात आले होते.

या रॅलीस जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून सुरुवात करण्यात आली. रॅलीत यशवंत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ७५ मीटर तिरंगा झेंड्याचे संचलन केले.

नेहरु विद्यालय व पी.के.पाटील विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी लेझिम नृत्य, के.आर.पब्लिक स्कुलच्या विद्यार्थ्यांनी मल्लखांब खेळाचे, उर्दू हायस्कुलच्या विद्यार्थ्यांनी तायक्वॉंदो खेळाचे प्रात्यक्षिके या रॅलीत दाखविली.

रॅलीत भारत माता की जय, वंदे मातरम्च्या घोषणा देण्यात आल्या. रॅली छत्रपती शिवाजी नाट्यगृहापासून सुरु करण्यात येवून अंधारे स्टॉप, शहीद शिरीषकुमार चौक, नगरपालिका मार्गे नेहरु पुतळयाजवळील तालुका क्रीडा संकुल येथे रॅलीचा समारोप करण्यात आला.

तालुका क्रीडा संकुलात विद्यार्थ्यांनी लेझिम नृत्य, मल्लखांब व तायक्वॉंदो खेळाचे प्रात्यक्षिके दाखविली. रॅलीत झांज पथक, लेझिम पथक, बँड पथक, खेळाडू पथक, एन.सी.सी, स्काऊट गाईड, एन.एस.एस. पथकासह सुमारे २ हजार विद्यार्थ्यांनी या रॅलीत भाग घेतला.

यावेळी तहसिलदार भाऊसाहेब थोरात, शिक्षणाधिकारी सतीश चौधरी, जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील, पुष्पेंद्र रघुवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती.

या रॅलीच्या यशस्वीतेसाठी राजेश शहा, श्रीराम मोडक, भिकु त्रिवेदी, उमेश शिंदे, आर.डी. सोनवणे, जावेद बागवान, योगेश बोदरकर, संतोष गुजराथी, महेंद्र फटकाळ, चेतना चौधरी, कविता वाघ, आरती तवर, सुनिल निकुंभे, राहुल पाटील या क्रीडा शिक्षक व समन्वयकांनी सहकार्य केले.

यशवंत विद्यालयाचे, डॉ.मयुर ठाकरे, क्रीडा मार्गदर्शक जगदीश चौधरी, आत्माराम बोथीकर, क्रीडा अधिकारी मुकेश बारी, महेंद्र काटे, कविता राठोड , क्रीडा मार्गदर्शक कल्पेश बोरसे, दिगंबर चौधरी यांनी रॅलीसाठी विशेष परीश्रम घेतले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com