दिड तासाच्या आत हरवलेल्या बालकाला दिले आईच्या ताब्यात

नंदुरबार शहर पोलीसांची कामगीरी, दोन युवकांचेही मानले आभार
दिड तासाच्या आत हरवलेल्या बालकाला दिले आईच्या ताब्यात

नंदुरबार | प्रतिनिधी- nandurbar

धुळे (dhule) जिल्ह्यातील सोनगीर (Songir) येथील बालक त्याच्या आईसोबत नंदुरबार येथे आजीकडे आला असतांना आज सकाळी १०.३० वाजेदरम्यान घरातुन चालत चालत लांब पर्यंत आला. तो घर विसरल्याने रडू लागल्याने दोन युवकांनी त्याला शहर (police) पोलीस ठाण्यात आणले.

नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या कर्मचार्‍यांनी अवघ्या दिड तासाच्या आत बालकाला आईचा शोध घेत तीच्या बालकाला तीच्या ताब्यात देत पाेलीस दलातील संवेदनशिल मनाचा परिचय दिला.

धुळे जिल्ह्यातील सोनगीर येथील मास्टर नगरी मध्ये राहणार्‍या सना कौसर शोएब खान या त्यांची आई व अल्फेज (२) या बालकासह नंदुरबार येथील मुजावर मोहल्ला येथे राहणार्‍या त्यांचा मावसा शेख ईक्बाल शेख ईस्माईल यांच्या कडे पाहुने म्हणुन काल दि.१७ रोजी आले.दरम्यान आज दि.१८ रोजी सकाळी १०.३० वाजेच्या दरम्यान घराचे दार उघडे असतांना,

दोन वर्षीय बालक अल्फेज हा बाहेर पडला चालत चालत मुजावर मोहल्लाहुन थेट गंणपती मंदिरापर्यंत पोहचला.त्याला परता येत नसल्ययाने तो रडायला लागला गणपती मंदिराजवळ दुकान असलेल्या विवेक अशोक डाबी रा.भाट गल्ली,नंदुरबार व योगेश निंबा माळी रा. मोठा माळीवाडा, नंदुरबार यांना बालक रडत असल्याचे दिसले,

तेथे गर्दीही दिसली त्यांनी त्या बालकाला नाव विचारले असता त्याने अल्फेज असे सांगीतले मात्र त्याला पत्ता सांगता येत नसल्याने या युवकांनी बालकाला घेवुन थेट नंदुरबार शहर पोलीस ठाणेेे गाठले तेथे पोलीसांना हकगीत सांगीतले.पोलीसांनी यांबाबत सोशन मिडीयासह विविध निरोप त्यांच्या नातेवाईकांपर्यंत पाठवला .

याबाबतता निरोप त्यांच्या घराशेजार्‍यांना लागल्याने त्यांनी याबाबत पोलीस ठाणे गाठत बालकाच्या नातेवाईंकाना फोन केला.त्या बालकाची आई व त्यांचे नातेवाईक पोलीस ठाण्यात आले.यावेळी सर्व ओळख पटल्यानंतर पोलसांनी अल्फेज या बालकाला त्याच्या आईच्या ताब्यात दिले.अवघ्या दिड तासात पोलीसंानी हरवलेला बालकाचा शोध लावला

.या दिड तासाच्या कालावधीत पोलीस व त्या दोन युवकांनी बालकाला आई वडींलांसारखे सांभाळले,सदरची कामगीरी पोसई माधुरी कंखरे, पोकॉ विजयकुमार पी.चौधरी, पोना अमोल जाधव,हेमंत बारी यांनी परिश्रम घेतले.पोलसांच्या या कामगीरी बाबत पालीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांनी कर्मचार्‍यांचा सत्कार केला.

नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या कर्मचार्‍यांनी अवघ्या दिड तासाच्या आत बालकाला आईचा शोध घेत तीच्या बालकाला तीच्या ताब्यात देत पोलीस दलातील संवेदनशिल मनाचा परिचय दिला.यावेळी आलकाच्या आईने पोलीसांनी धन्यवाद देवुन पोलीस ठाण्यातुन रवाना झाल्या.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com