नंदुरबारकरांसाठी गुड न्यूज : सोमवारपासून मिळणार एक दिवसाआड पाणी

नंदुरबारकरांसाठी गुड न्यूज :  सोमवारपासून मिळणार एक दिवसाआड पाणी

नंदुरबार । Nandurbar । प्रतिनिधी

जून महिन्यात पावसाने पाठ फिरविल्याने शहरात पाणीपुरवठा (Water supply) करणार्‍या विरचक धरणातील (Virchak Dam) शिवण मध्यम प्रकल्पात (Sivan Madhyam Project) अल्प पाणीसाठा असल्याने नंदुरबारकर नागरिकांना 2 दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत होता. परंतु, जुलै महिन्यात समाधानकारक पाऊस (Satisfactory rain) झाल्याने प्रकल्पात 82 टक्के पाणीसाठा असल्यामुळे आता पुन्हा 1 ऑगस्टपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा (One day supply of water) करण्याचा निर्णय पालिकेने (municipality) घेतला आहे. याबाबतची माहिती शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी (Former MLA Chandrakant Raghuvanshi) यांनी दिली.

मागील वर्षी नंदुरबार शहर व परिसरात दमदार पाऊस बरसला नव्हता. हिवाळ्यात नागरिक पाण्याच्या वापर कमी करत असल्याने 2 दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय पालिकेने घेतला होता. शहरातील नागरिकांना रणरणत्या उन्हाळ्यात पाण्याची गरज लक्षात घेता नगराध्यक्ष सौ.रत्ना रघुवंशी, उपनगराध्यक्ष कुणाल वसावे, पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील, मुख्याधिकारी अमोल बागुल यांनी नियोजन करीत पुन्हा जैसे थे एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला होता.

जून महिन्यात पाऊस लांबल्याने पुन्हा विरचक धरणातील पाण्याची पातळी खालावत चालली होती. मृतसाठ्यातून शहरात पाणीपुरवठा करण्यात येत असल्याने 2 दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे निर्णय पालिकेने घेतला. जुलैच्या पहिल्याच आठवड्यात सर्व परिसरात दमदार पर्जन्यवृष्टी झाल्याने पाणी कपातीचे संकट दूर होईल अशी नागरिकांना अपेक्षा होती. सतत दमदार बरसणार्‍या पावसामुळे शहराला पाणीपुरवठा करणार्‍या विरचक धरणातील शिवण मध्यम प्रकल्पात पाणी साठ्याची वाढ झाल्याने पाण्याचे टेन्शन मिटले.

पाण्याचे संकट मिटले

सध्या प्रकल्पातील पाण्याची पातळी 237.85 मिटर असून,82 टक्के दलघमी पाणीसाठा असल्यामुळे मुबलक प्रमाणात नागरिकांना पाणी वापरता येणार आहे. मागील वर्षी याचवेळी 42 टक्के पाणी साठा होता. गतवर्षाच्या तुलनेत 40 टक्क्यांनी पाण्याची वाढ झाली असल्याने शहरातील नागरिकांवरील पाणीबाणीचे संकट मिटले आहे.

शहराला पाणीपुरवठा करणार्‍या विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी वाढली जरी आहे तरी, नागरिकांनी पाण्याची नासाडी करू नये.आवश्यक तेवढेच पाणी वापरावे. नळांना तोट्या लावाव्यात जेणेकरून पाण्याच्या अपव्यय टळेल.

2 दिवसाआड होत असलेल्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांना अडचणी निर्माण झाले असतील तर दिलगिरी व्यक्त करते. आता पुन्हा जैसे थे 1 दिवसाआड पाणीपुरवठा करण्याच्या निर्णय सर्वानुमते घेण्यात आलेला आहे असे नगराध्यक्षा सौ.रत्ना रघुवंशी यांनी सांगीतले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com