घरकुल अनुदान घोटाळा : एकाच लाभार्थ्याच्या खात्यावर दोन वेळा अनुदान वर्ग

गवंडी प्रशिक्षण योजनेंतर्गत पाच दिवसात घरकुल कसे बांधले? ‘देशदूत’च्या वृत्तमालिकेमुळे संबंधीत यंत्रणेकडून तारखांमध्ये जुळवाजुळव
घरकुल अनुदान घोटाळा : एकाच लाभार्थ्याच्या खात्यावर दोन वेळा अनुदान वर्ग

नंदुरबार | NANDURBAR प्रतिनिधी

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत (Pradhan Mantri Awas Yojana) बांधण्यात आलेल्या घरकुलांसाठी एक लाख रुपये तर गवंडी प्रशिक्षण घरकुल (Mason training crib) योजनेसाठी १ लाख २० हजार रुपयांचे अनुदान (grant) शासनाकडून (Govt) दिले जाते. यापैकी एका व्यक्तीला एकाच योजनेचा लाभ देण्यात येतो. असे असतांना उमराणी बु.ता.धडगाव येथील रमेश ठाकरे या लाभार्थ्याच्या बनावट बँक खात्यात (fake bank account) एकदा नव्हे तर दोन वेळा अनुदान वर्ग (Subsidy class) झाले आहे. त्यामुळे दुसर्‍यांदा मिळालेले अनुदान हे कोणत्या लाभार्थ्याचे आहेत, हा संशोधनाचा विषय आहे. त्यामुळे घरकुल योजनेतील बेजबाबदार (Irresponsible management) कारभार चव्हाटयावर आला आहे. दरम्यान, गवंडी प्रशिक्षण योजनेत केवळ पाच दिवसात पाच मजूरांकडून घरकुल पूर्ण बांधल्याचे दाखवण्यात आले आहे. त्यामुळे खरोखरच घर कसे बांधले गेले असेल? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

घरकुल अनुदान घोटाळा : एकाच लाभार्थ्याच्या खात्यावर दोन वेळा अनुदान वर्ग
Visual Story : भारतातीलच  नव्हे तर आशिया खंडातील ही आहे पहिली डॉक्टर 'मिस वर्ल्ड'

उमराणी बु.ता.धडगाव येथे प्रधान मंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल न बांधता लाभार्थ्याच्या नावाने बनावट कागदपत्रे सादर करुन दुसर्‍याच व्यक्तीकडून अनुदान हडप करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत सखोल माहिती घेता अनेक गंभीर बाबी समोर येत आहेत.

घरकुलाची अनुदान रक्कम जसजसे घरकुलाचे बांधकाम होते तसतसे टप्प्याटप्प्याने लाभार्थ्याच्या खात्यात वर्ग करण्यात येते. मात्र, रमेश ठाकरे याच्या खात्यात दि. २ जून २०२२ रोजी १ लाख २० हजार रुपये एकाच वेळी वर्ग करण्यात आले आहेत.

त्यानंतर पुन्हा पाच दिवसांनी प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत ७ जून २०२२ रोजी ४५ हजार रुपये, तत्पुर्वी १० मार्च २०२२ रोजी १५ हजार असे ६० हजार रुपये अनुदान वर्ग करण्यात आले आहे. त्यामुळे रमेश ठाकरे याच्या बनावट खात्यात हे ६० हजार रुपये कोणत्या लाभार्थ्याचे आहे, हा संशोधनाचा विषय आहे. याबाबत चौकशी होण्याची गरज आहे.

घरकुल अनुदान घोटाळा : एकाच लाभार्थ्याच्या खात्यावर दोन वेळा अनुदान वर्ग
Visual Story : बॉलिवूड अभिनेत्याचं ट्वीट .. सौदी अरेबियामध्ये आफताबसारख्या…

दरम्यान, रमेश ठाकरे याच्यासह सात जणांचे प्रकरण उघडकीस आली आहेत, अशी धडगाव तालुक्यात अजून २५० च्यावर बनावट खाते उघडून अनुदान हडप करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

गवंडी प्रशिक्षण घरकुल योजनेत लाभार्थ्याला घरकुलाचे बांधकाम कसे करावे याबाबत प्रशिक्षण दिले जाते व त्याच घराचा लाभ लाभार्थ्याला दिला जातो. यासाठी ४५ ते ९० दिवसांचे प्रशिक्षण देवून घरकुल उभारले जाते.

मात्र, धडगाव तालुक्यात अशाप्रकारे कोणतेही प्रशिक्षण न देता ज्यांना घरे बांधण्याचे प्रशिक्षण दिले असल्याचे दाखवण्यात आले आहे, त्यांनी घर बांधलेलीच नसल्याचे निष्पन्न झाले आहे. बरं प्रशिक्षण झालेले दाखवले असले तरी दोन घरकुले अशी आहेत ज्या ठिकाणी केवळ पाच मजूर कामाला दाखवून पाच दिवसात घरकुल उभारुन त्याचा लाभ दिल्याचे दाखवण्यात आले आहे.

पाच दिवसात संपुर्ण घरकुल पाच मजूर बांधू शकतात का? असा प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित होत असून प्रधानमंत्री आवास योजनेच्या नावावर कोटयावधींचे अनुदान हडप करण्याचा गोरखधंदा ग्रामीण भागात सुरु असल्याचे दिसून येत आहे.

त्यामुळे घरकुल योजनेतील बेजबाबदार कारभार चव्हाटयावर आला आहे. याबाबत प्रशासनाने सखोल चौकशी करुन दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी होत आहे.

दरम्यान, दैनिक देशदूतमध्ये घरकुल अनुदान घोटाळयाबाबत वृत्तमालिका सुरु असल्याने गैरव्यवहार करणारी यंत्रणा सतर्क झाली असून कागदपत्रांची जुळवाजुळव तसेच तारखांचीही जुळवाजुळव सुरु झाली आहे.eshdoot

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com