घरकुल अनुदान घोटाळा : दिशा समितीच्या बैठकीत चौकशीचे आदेशः खा.डॉ.हीना गावित

तक्रारी नसलेल्या ठिकाणीही चौकशी करणार, अनेेकांच्या सहभागाची शक्यता, महाविकास आघाडीकडून दुर्लक्ष
खा.डॉ.हीना गावित
खा.डॉ.हीना गावित

नंदुरबार | प्रतिनिधी NANDURBAR

पंतप्रधान आवास योजनेंतर्गत (Pradhan Mantri Awas Yojana) अनेक लाभार्थ्यांना अंधारात ठेवून (beneficiaries in the dark) त्यांच्या नावावर दुसर्‍याच व्यक्तींकडून घरकुलाचे(other persons) अनुदान हडप करण्याचे (Grabbing the subsidy of Gharkula)प्रकार उघडकीस आले आहेत. याबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यांची चौकशी (inquiry) तर होणारच आहे. मात्र, ज्या ठिकाणी तक्रारी नसतील अशा सर्व घरकुलांची चौकशी करण्याच्या सूचना दिशा समितीच्या (Direction Committee) बैठकीत संबंधीत अधिकार्‍यांना दिल्या आहेत. हा घोटाळा एक दोन व्यक्तींचा नसून यात अनेक जणांचा सहभाग असण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे या घोटाळयात नेमकी चुक कोणाची आहे, त्याची सखोल चौकशी करण्यात येईल. त्यात जे दोषी आढळतील (found guilty)त्यांच्यावर कठोर कारवाई (Strict action)करण्याचा इशारा खा.डॉ.हीना गावित (warned Dr. Heena Gavit) यांनी ‘देशदूत’शी बोलतांना दिला.

दरम्यान, जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीच्या काळातील पदाधिकार्‍यांनी याबाबत कोणतीही दखल घेतली नाही. मात्र आता भाजपाची सत्ता असल्याने लवकरच दोषींवर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरु झाल्याचेही त्यांनी सांगितले.

उमराणी बु.ता.धडगाव येथे पंतप्रधान आवास योजनेंतर्गत बनावट कागदपत्रे सादर करुन बँकेंत बनावट खाते उघडून घरकुल योजनेचे अनुदान दुसर्‍याच व्यक्तीने हडप केल्याचे प्रकरण सध्या चर्चेत आहे. याबाबत दैनिक ‘देशदूत’मध्ये वस्तुुनिष्ठ वृत्तमालिका प्रकाशित करण्यात येत आहे.

खा.डॉ.हीना गावित
Breaking News : संतनगरीत राहुल गांधी म्हणाले : भाजपा देशात हिंसा पसरवित आहे !

याबाबत खा.डॉ.हीना गावित यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, पंतप्रधान आवास योजना ही एक क्रांतीकारी योजना असून प्रत्येक व्यक्तीचे स्वतःचे घर असावे हा या योजनेचा स्तुत्य उद्देश आहे. सन २०१५-१६ मध्ये सुरुवातीला ही योजना आली तेव्हा ऑनलाईन लाभार्थी निवडले जात होते.

परंतू आधार कार्ड व बँकेचे खाते टाकण्यासाठी वेबसाईटवर ‘एडीट’चा पर्याय होता. त्यावेळी आधारकार्ड, बँकांचे खाते बदलण्याची सुविध होती. काही ठिकाणी २०११ च्या जनजगणनेप्रमाणे यादी होती. त्यातील नाव संक्षिप्त स्वरुपात होती.

खा.डॉ.हीना गावित
VISUAL STORY : हिरवी साडी, कपाळावर कुंकू, भडक लिपस्टिक झुमके, बांगड्या घालून दिसला ‘हा’ अभिनेता

त्यामुळे तेथे लाभार्थ्यांची नावे बदलली गेल्याची शक्यता आहे. मात्र, त्याचाच काही लोकांनी फायदा घेतला असून ज्या लाभार्थ्यांच्या नावे घरकुलाचा लाभ देण्यात आला, त्यांना अनभिज्ञ ठेवून बनावट आधारकार्ड, बनावट बँक खाते उघडून दुसर्‍याच व्यक्तीकडून अनुदान हडप करण्यात आल्याच्या तक्रारी आहेत.

ही बाब आपण केंद्र सरकारच्या संबंधीत विभागाच्या अधिकार्‍यांना लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी ‘एडीट’चा पर्याय लॉक केला आहे. परंतू घरकुल योजनेचा लाभ कोणत्या व्यक्तीला मिळणार आहे, कोणाचे नाव यादीत आहे, कोणाचे बँक अकाऊंट आहे, हे पाहण्याचे काम संबंधीत गावातील ग्रामसेवकाचे आहे. त्यांनी काय काम पाहिले हा प्रश्‍न आहे.

खा.डॉ.हीना गावित
VISUAL STORY : वय 55, तरीही तीला पाहताच उरात होतेय 'धकधक'....

ग्रामसेवकाकडे घरकुल लाभार्थ्यांची यादी असते, घरकुलाचा सर्वे करण्याचे काम संबंधीत अभियंत्याचे असते, ते सर्व्हे करुन फोटो संकेतस्थळावर अपलोड करत असता त्यानंतर अनेक बाबींची तपासणी करुन घरकुलाचा लाभ दिला जातो.

त्यामुळे हा घोटाळा किंवा अनियमीतता हे एकटया दुकटयाचे नसून यात अनेक बडयाधेंडांचा सहभाग असण्याची दाट शक्यता आहे. याबाबत आपण दिशा समितीच्या बैठकीत संबंधीत अधिकार्‍यांना सुचना देवून या संपुर्ण गैरप्रकाराची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

लवकरच या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल, यात दोषी असलेल्या सर्वच संबंधीतांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही खा.डॉ.हीना गावित यांनी दिला. ज्या ठिकाणच्या तक्रारी आल्या आहेत, त्यांची तर चौकशी होणार आहे, परंतू ज्या ठिकणच्या तक्रारी आल्या नाहीत अशा सर्व ठिकाणी चौकशी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

खा.डॉ.गावित म्हणाल्या, याबाबत पुर्वीदेखील तक्रारी आल्या होत्या. परंतू जिल्हा परिषदेत तेव्हा महाविकास आघाडीची सत्ता होती. त्यांच्या पदाधिकार्‍यांनी याबाबत कुठलीच दखल घेतली नाही. परंतू आता जिल्हा परिषदेत भाजपाची सत्ता असल्याने त्वरीत चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. दोषी कोणीही असो त्याची गय केली जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com