
शहादा | ता. प्र. SHAHADA
शहादा शहरातून काल दि. 26 रोजी रात्रीच्या सुमारास गावठी बनावटीचे एक पिस्तोल व दोन जिवंत काडतुस असा सुमारे 35 हजार 600 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या घटनेतील संशयित आरोपी धीरज गणपत कुवर यास अटक करण्यात आली आहे.
याबाबत पोलीस सुत्रानी दिलेल्या माहितीनुसार, शहादा शहरातील प्रेस मारुती मैदानात गावठी बनावटीचे पिस्तूल विक्री करण्याच्या उद्देशाने आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.