विधान परिषद निवडणूकीसाठी कॉंग्रेसतर्फे गौरव वाणी यांची उमेदवारी निश्‍चित?

विधान परिषद निवडणूकीसाठी कॉंग्रेसतर्फे गौरव वाणी यांची उमेदवारी निश्‍चित?

मोदलपाडा | वार्ताहर MODALPADA

धुळे (Dhule) व नंदुरबार (Nandurbar) जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाच्या (District Local Self-Government Constituency) निवडणूकीसाठी (Elections) कॉंग्रेसतर्फे (Congress) नगरसेवक गौरव वाणी (Corporator Gaurav Vani) यांचे नाव निश्‍चित झाल्याचे समजते. नंदुरबार जिल्ह्यातून उमेदवारीसाठी तीन नावे पाठवण्यात आली आहेत. त्यात वाणी यांचा समावेश आहे.

विधान परिषद निवडणूकीसाठी कॉंग्रेसतर्फे गौरव वाणी यांची उमेदवारी निश्‍चित?
हार्दिक पांड्या उंची घड्याळांचा शौकिन, पाहा त्याच्याकडचे कलेक्शन

धुळे व नंदुरबार जिल्हा स्थानिक स्वराज्य मतदार संघाचे आ.अमरिशभाई पटेल यांचा कार्यकाल पुढील महिन्यात पूर्ण होत आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने विधान परिषदेच्या या मतदार संघाची निवडणूक येत्या १० डिसेंबर रोजी जाहीर केली आहे.

भाजपाने विद्यमान आ.अमरिशभाई पटेल यांची उमेदवारी दोन दिवसापूर्वीच घोषित केली आहे. तथापि कॉंग्रेसचा उमेदवार अजूनही निश्चित झालेला नाही. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याची अटकळ बांधली जात असतांना कॉंग्रेसनेही हालचाली सुरू केल्या आहेत.

यासाठी नंदुरबार व धुळे जिल्ह्यातून काही नावेही कॉंग्रेस निवडणूक समितीने मागविली आहे. त्यानुसार नंदुरबार जिल्ह्यातून जिल्हा कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष दिलीप नाईक, जि.प.सदस्या हेमलता शितोळे, तळोदा येथील माजी उपनगराध्यक्ष व गटनेते गौरव वाणी यांच्यासह धुळ्याचे जिल्हाध्यक्ष श्याम सनेर यांच्या नावाची चर्चा आहे.

या सर्वांना अर्ज भरण्याकामी लागणारी सर्व कागदपत्रे तयार ठेवण्याचे आदेशही देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

त्यामुळे सदर निवडणूक ही बिनविरोध होणार नाही हे निश्‍चित झाले आहे. आता या चार उमेदवारांमधून कोणाला अधिकृत उमेदवारी दिली जाते याबाबत उत्सुकता आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com