विधान परिषद निवडणुकीसाठी कॉंग्रेसकडून गौरव वाणी तर दीपक दिघे यांची अपक्ष उमेदवारी

विधान परिषद निवडणुकीसाठी कॉंग्रेसकडून गौरव वाणी तर दीपक दिघे यांची अपक्ष उमेदवारी

नंदुरबार/मोदलपाडा | प्रतिनिधी NANDURBAR

धुळे व नंदुरबार जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था (Dhule and Nandurbar District Local Self Government Institutions) विधान परिषदेच्या (Legislative Council) जागेसाठी दि.१० डिसेंबरला मतदान (Voting) होणार आहे. आज दि.२३ रोजी तळोदा येथील माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक गौरव वाणी (Gaurav Vani) यांनी कॉंग्रेसकडून (Congress) तर नंदुरबारचे नगरसेवक दीपक दीघे (Deepak Dighe) यांनी अपक्ष (independent) उमेदवारी (Candidacy) धुळे येथील जिल्हाधिकारी कार्यालयात (Collector's Office) दाखल केली.

धुळे, नंदुरबार जिल्हा स्थानिक स्वराज्य मतदार संघाच्या विधान परिषदेच्या जागेसाठी निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. भाजपातर्फे अमरिशभाई पटेल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

आज कॉंग्रेसतर्फे तळोदा येथील माजी उपनगराध्यक्ष गौरव वाणी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी माजी मंत्री अँड.पद्माकर वळवी, जिल्हा परिषद अध्यक्षा ऍड.सीमा वळवी, धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील, जिल्हाध्यक्ष श्याम सनेर, नंदुरबार जिल्हा प्रभारी पानगव्हाणे, कार्याध्यक्ष दिलीप नाईक, नगरसेवक सुभाष चौधरी, ओबीसी सेलचे प्रदेश सरचिटणीस बापू कलाल, संजय वाणी आदी उपस्थित होते.

तसेच नंदुरबारचे कॉंग्रेसचे नगरसेवक दीपक प्रभाकर दिघे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्यासोबत माजी नगराध्यक्ष कुणाल वसावे, पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील, परवेज खान आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com