कोळदे येथे गरीब कल्याण संमेलन

पंतप्रधान मोदी यांची ऑनलाईन उपस्थिती
कोळदे येथे गरीब कल्याण संमेलन

नंदुरबार Nandurbar। प्रतिनिधी-

स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्षाचे (nectar of independence) औचित्य साधून राष्ट्रीय स्तरावर गरीब कल्याण संमेलन (Garib Kalyan Sammelan) (शत प्रतिशत सशक्तीकरण) आयोजित करण्यात आले होते. तालुक्यातील कोळदे येथील कृषि विज्ञान केंद्रात (Center for Agricultural Sciences) या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या संमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Modi) यांनी शिमला येथून ऑनलाईन मार्गदर्शन केले. सुरुवातीला पंतप्रधान मोदी यांनी देशभरातील विविध ठिकाणच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी उपस्थिताना विविध शासकीय योजनांबद्दलच्या चित्रफिती दाखविण्यात आल्या. पंतप्रधानांनी बोलताना 2047 सालापर्यंत भारत विश्वगुरु (Bharat Vishwaguru) बनण्यासाठी ‘सबका साथ सबका विकास सबका विश्वास सबका प्रयास’ ही चतुसूत्री अंमलात आणणे गरजेचे असल्याचे सांगितले.

कार्यक्रमासाठी डॉ. हेडगेवार सेवा समितीचे सचिव डॉ. नितीन पंचभाई, जिल्हा कृषि विकास अधिकारी प्रदीप लाटे, नाबार्डचे डीडीएम प्रमोद पाटील, पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ.यु.डी.पाटील, धुळे येथील कापूस तज्ञ डॉ. सुदामसिंग राजपूत, पद्माकर कुंदे, जयंत उत्तरवार आदी उपस्थित होते. डॉ. नितीन पंचभाई यांनी याप्रसंगी आयोजित खरिप पूर्व नियोजन बैठकीचा लाभ घेण्याचे उपस्थिताना आवाहन केले.

कृषि विज्ञान केंद्रात गरीब कल्याण संमेलनादरम्यान खरिप पूर्व नियोजन शेतकरी मेळावा (Kharif pre-planning farmers meet) आयोजित करण्यात आला आहे. होता. या एकदिवसीय शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रमामध्ये खरिप पूर्व नियोजन, कापूस लागवड तंत्रज्ञान, नैसर्गिक शेती, कृषि यांत्रिकीकरण, सुधारीत शेती पद्धती या विषयावर मार्गदर्शन यावेळी करण्यात येणार आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषि अभियांत्रिकी जयंत उत्तरवार यांनी केले. किटक शास्त्रज्ञ डॉ.सुदामसिंग राजपूत यांनी सुरुवातीपासून कापसावरील किडींचे व्यवस्थापन, वाणांची निवड, जैविक औषधींचा वापर याविषयी मार्गदर्शन केले. कृषि महाविद्यालय नंदुरबारचे डॉ.बोराळे यांनी दुर्लक्षित तृणधान्ये पिके आणि त्यांचे लागवड (Cereal crops and their cultivation) तंत्रज्ञान याविषयी मार्गदर्शन केले. पीक संरक्षण तज्ञ पद्माकर कुंदे यांनी बियाणे व बिजप्रक्रीया याविषयी मार्गदर्शन केले.

कृषिविद्या उमेश पाटील यांनी पिकांचे विविध वाण व त्यांचे वैशिष्ट्ये तर जयंत उत्तरवारयांनी जलव्यवस्थापन याबद्दल मार्गदर्शन केले. सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन पद्माकर कुंदे यांनी केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com