बांधकाम सभापतीपदाचे खाते वाटप न करता आटोपली जिल्हा परिषदेची सभा

शिक्षण सभापतीपदी गणेश पराडके तर आरोग्य सभापतीपदी हेमलता शितोळे
बांधकाम सभापतीपदाचे खाते वाटप न करता आटोपली जिल्हा परिषदेची सभा

नंदुरबार | प्रतिनिधी NANDURBAR

नंदुरबार येथील जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad) सभागृहात आज दि.३ नोव्हेंबर रोजी विषय सभापतींना खाते वाटपासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले. यात शिक्षण समिती सभापतीपदी गणेश पराडके तर आरोग्य समिती सभापतीपदी हेमलता शितोळे यांची निवड करण्यात आली आहे. मात्र बांधकाम समिती सभापती व अर्थ सभापती पदासाठी पुन्हा रस्सीखेच सुरु झाल्याचे दिसून आले. त्यामुळे या दोन्ही सभापतींचे खाते वाटप न करता बैठकीचा समारोप करण्यात आला. दरम्यान, महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी संगिता भरत गावीत, समाज कल्याण सभापतीपदी शंकर आमश्या पाडवी यांची यापुर्वीच निवड करण्यात आली आहे.

बांधकाम सभापतीपदाचे खाते वाटप न करता आटोपली जिल्हा परिषदेची सभा
Video तापी नदीत असा कोसळला ट्रक...
बांधकाम सभापतीपदाचे खाते वाटप न करता आटोपली जिल्हा परिषदेची सभा
Video तापी नदीत असा कोसळला ट्रक...

जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापतीपदाची दि.२० ऑक्टोबर रोजी निवड करण्यात आली होती. आज दि.३ नोव्हेंबर रोजी नंदुरबार जिल्हा परिषदेच्या उर्वरित विषय सभापतीच्या खातेवाटपासाठी आज सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते.

या सभेच्या अध्यक्षस्थानी जि.प.अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावीत होत्या. यावेळी व्यासपीठावर उपाध्यक्ष सुहास नाईक, मुख्यकार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, समाज कल्याण सभापती शंकर पाडवी, महिला व बाल कल्याण समिती सभापती संगिता भरत गावीत, विषय समिती सभापती गणेश पराडके, हेमलता शितोळे, उपमुख्यकार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील उपस्थित होते.

या सभेत विषय समिती सभापतीची निवड करण्यात आली. यात शिक्षण समिती सभापतीपदी गणेश पराडके, समाज कल्याण समिती सभापतीपदी शंकर आमश्या पाडवी, महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी संगिता भरत गावीत, आरोग्य समिती सभापतीपदी हेमलता शितोळे यांची निवड जि.प.अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावीत यांनी घोषणा केली.

त्यानंतर कृषी व पशुसंवर्धन सभापतीपदी जि.प.उपाध्यक्ष सुहास नाईक यांच्या नावाची घोषणा जि.प.अध्यक्षांनी केली. त्यानंतर बांधकाम समिती व अर्थ समितीच्या सभापतीपदी कोणाची वर्णी लावावी. याबाबत पुन्हा रस्सीखेच दिसून येत आहे. त्यामुळे या दोन्ही खात्यांचे वाटप न करता बैठकीचा समारोप करण्यात आला. यावेळी जि.प.सदस्य वेगवेगळया गटात बसून कुजबुज करतांना दिसले. या बैठकीत जि.प.च्या १० समितीच्या सदस्यांची निवड करण्यात आली.

स्थायी समितीत अध्यक्ष डॉ.सुप्रिया गावीत, जि.प.उपाध्यक्ष सुहास नाईक, समाज कल्याण समिती सभापती शंकर आमश्या पाडवी, महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी संगिता भरत गावीत, शिक्षण समिती सभापती गणेश पराडके, आरोग्य समिती सभापतीपदी हेमलता शितोळे यात सदस्य म्हणून विजयसिंग पराडके, भरत माणिकराव गावीत, रतन खत्र्या पाडवी, छात्रसिंग पाडवी, जयश्री दिपक पाटील, राया मावची, मोहनसिंग शेवाळे, एश्‍वर्यादेवी जयपालसिंह रावल तर

जल व्यवस्थापन समितीत सदस्य म्हणून डॉ.कुमूदिनी विजयकुमार गावीत, हिरा रविंद्र पाडवी, ऍड.सीमा पद्माकर वळवी, ऍड.राम रघुवंशी, सुनिता पवार, वंदना पटले, कृषी समितीच्या सदस्यपदी गुलाल भिल, निर्मला सिताराम राऊत, सुनिता भरत पवार, भारती भिल, सुशिला कोकणी, जान्या पाडवी, रजनी सुरेश नाईक, मोगरा पवार, शकुंतला शिंत्रे, नामसिंग वळवी.

समाज कल्याण समिती सदस्यपदी छात्रसिंग पाडवी, रजनी सुरेशा नाईक, मधुकर सुरूपसिंग नाईक, हिरा रविंद्र पराडके, गुलाल भिल, वृंदाबाई नाईक, पार्वतीबाई गावीत, शांताराम साहेबराव पाटील, संगिता प्रकाश वळवी, बबिता नरेंद्र गावीत, विजय प्रकाश गावीत.

शिक्षण व क्रीडा समिती सदस्यपदी जितेंद्र पाडवी, देवमन पवार, मोगरा पवार, वृंदाबाई नाईक, पार्वतीबाई गावीत, संगिता पावरा, रविंद्र पराडके, सुनिल गावीत, आरोग्य समिती सदस्यपदी अजीज सुरूपसिंग नाईक, रूपसिंग तडवी, सुभास पटले, धर्मसिंग वसावे, अर्चना शरद गावीत, भारती अरूण भिल, राजश्री शरद गावीत, जागृती सचिन मोरे,

बांधकाम समिती सदस्यपदी हिरा रविंद्र पाडवी, ऍड.राम रघुवंशी, अर्चना गावीत, निलुबाई पाडवी, शैलेश वसावे, गिता चांद्या पाडवी, शांताराम पाटील, सुनिल सुरेश गावीत, अर्थ समितीच्या सदस्यपदी प्रताप वसावे, राया मावची, जिजाबाई ठाकरे, राजश्री गावीत, प्रकाश कोकणी, सुरैया बी.मक्राणी, संगिता पावरा, शकुंतला शिंत्रे

पशुसंवर्धन व दुग्ध शाळा समितीत सदस्यपदी मंगलाबाई राजेंद्र जाधव, धरमसिंग वसावे, विरसिंग ठाकरे, मधुकर नाईक, कविता पावरा, वंदना प्यारेलाल पटले, लताबाई वळवी, माया ताराचंद माळचे यांची निवड करण्यात आली.

महिला व कल्याण समिती सदस्यपदी ऍड.सीमा पद्माकर वळवी, बाजुबाई वसावे, मंगलाबाई जाधव, जीजाबाई ठाकरे, सुशिलाबाई कोकणी, कविता पावरा, गिता चांद्या पाडवी, सुरैया बी. मक्राणी यांची निवड करण्यात आली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com