सोळाशे रूपयांच्या लाचेसाठी मुख्याध्यापक झाले गजाआड

सोळाशे रूपयांच्या लाचेसाठी मुख्याध्यापक झाले गजाआड

नंदुरबार nandurbar । प्रतिनिधी

नवापूर तालुक्यातील सुळी येथे शाळा सोडल्याच्या दाखल्यावर असलेल्या आईचे चुकीचे नाव दुरुस्त करून घेण्यासाठी व इयत्ता दहावीचे मार्कशीटसाठी 1 हजार 600 रूपयांची लाच (bribe) घेतांना येथील माध्यमिक विद्यालयातील मुख्याध्यापकाला (headmaster) रंगेहात अटक करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

तक्रारदार यांनी सन 2017-2018 यावर्षी माध्यमिक विद्यालय सुळी, ता.नवापूर येथे इयत्ता दहावीचे शिक्षण घेतले आहे. तक्रारदार हे त्यांचा शाळा सोडल्याचा दाखला व मार्कशीट घेण्यासाठी माध्यमिक विद्यालय, सुळी ता.नवापूर येथे गेले असता मुख्याध्यापक नंदलाल शांताराम शिनकर रा. - साईनगरी ्मेन रोड, नवापूर.यांनी तक्रारदाराकडून दि.14 जानेवारी 2023 रोजी पाच हजार रुपये घेऊन तक्रारदार यांना शाळा सोडल्याचा दाखला दिला. तक्रारदार यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर त्यांच्या आईचे नाव चुकीचे असल्याने , चुकीचे नाव दुरुस्त करून घेण्यासाठी व त्यांचे इयत्ता दहावीचे मार्कशीट देण्यासाठी तक्रारदार यांनी मुख्याध्यापक नंदलाल शांताराम शिनकर यांना पुन्हा विनंती केली.

यावेळी आलोसे मुख्याध्यापक यांनी तक्रारदाराकडून शाळा सोडल्याच्या दाखल्यावरील आईचे नाव दुरुस्त करून देणे व नाशिक येथील बोर्ड कार्यालयातून त्यांचे मार्कलिस्ट आणून देण्याच्या मोबदल्यात 2 हजार रूपये लाचेची मागणी केली. त्यानंतर आज दि.17 जानेवारी 2023 रोजी तक्रारदाराकडून 1 हजार 600 रूपये लाच स्वीकारतांना लाच लुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.

याबाबत नवापूर पोलीस स्टेशन जिल्हा नंदुरबार येथे गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू होती.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक , ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर , अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र एन.एस.न्याहळदे, पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र नरेंद्र पवार यांच्या मागदर्शनाखाली पर्यवेक्षण अधिकारी पोलिस उप अधीक्षक ला प्र वि नंदुरबार राकेश चौधरी, पो.नि. समाधान एम.वाघ. पोहवा विजय ठाकरे, पोहवा अमोल मराठे, पोना देवराम गावित यांच्या पथकाने केली.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com