अक्कलकुव्याच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही!

अक्कलकुवा येथे काँग्रेस सभासद नोंदणीप्रसंगी ना.के.सी.पाडवी यांचे आश्वासन
अक्कलकुव्याच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही!

अक्कलकुवा (Akkalkuwa) । प्रतिनिधी -

जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad) पोट निवडणुकीत (election) अक्कलकुवा आणि खापर गटात मतदारांनी काँग्रेसला (Congress) भरभरुन मतदान (Voting) केले. हे दोन्ही गट भाजपाकडून खेचून आणण्यात काँग्रेसला यश आले. त्यामुळे येणार्‍या काळात अक्कलकुवा शहरात विकास कामे करण्याची नैतिक जबाबदारी आपण स्विकारली आहे. शहराच्या विकासासाठी निधीची (Funding) कमतरता पडु देणार नाही, अशी ग्वाही आदिवासी विकास मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री अ‍ॅड.के.सी. पाडवी (Guardian Minister Adv.K.C. Padvi) यांनी दिली.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सभासद नोंदणी मोहीमेला अक्कलकुवा येथून प्रारंभ झाला. त्यावेळी ना.पाडवी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ.शिरीष नाईक होते. मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून काँग्रेसचे महाराष्ट्र उपाध्यक्ष तथा माजी मंत्री अ‍ॅड.पद्माकर वळवी, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सीमा वळवी, जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती रतन पाडवी, महिला बालकल्याण सभापती निर्मला राऊत, सभापती अजित नाईक, जि.प.सदस्य सी.के.पाडवी, प्रताप वसावे, सुरैय्याबी मक्राणी, हेमलता शितोळे, अक्कलकुवा पंचायत समितीच्या सभापती मनीषा वसावे, उपसभापती विजय पाडवी, जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष दिलीप नाईक, सुभाष पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास नाईक, काँग्रेसचे आरिफ मक्राणी, हाफीज जुबेर मक्राणी, अमृत चौधरी, हनिफ बलोच, हाफिज मक्राणी, दिलीप पाडवी, हुजेफा मक्राणी, माजी जि.प.सदस्य लतीफ अन्सारी, मन्सूर मेमन, शांतीलाल जैन, अमृत चौधरी, डी.आय.मक्राणी, देवचंद अहिरे, आर.सी.गावित आदी उपस्थित होते. यावेळी अक्कलकुवा येथे नव्याने बनविण्यात आलेले काँग्रेस संपर्क कार्यालयाचे उदघाटन पालकमंत्री ना. के. सी. पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले. पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या सदस्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात पक्षाच्या सद्स्य नोंदणीचे प्रमाणपत्र नुतन सदस्यांना देण्यात आले.

ना.पाडवी पुढे म्हणाले की, गावाच्या सर्वांगिण विकासासाठी सर्वांचे पाठबळ आणि सहकार्याची गरज असते. केवळ स्वार्थासाठी चांगल्या कामाला विरोध करणे हे चुकीचे आहे. काही लोक सत्तेत राहून आपल्याच सरकारच्या विरोधात आंदोलने करतात, हे नैतिकतेला धरुन नाही. सामंजस्याने बसून मार्ग काढता येतो. मात्र त्यासाठी सद्सद्विवेक बुद्धी असणे महत्त्वाचे आहे असे सांगुन अक्कलकुवा शहराच्या विकासासाठी सांघिक प्रयत्नांची गरज असल्याचे सांगितले.

यावेळी माजी मंत्री अ‍ॅड. पद्माकर वळवी, आ.शिरीष नाईक यांनी केंद्र सरकार व भाजपवर हल्ला करीत केंद्र सरकार ईडी, सी. बी. आय. एन. सी. बी. या सारख्या संस्थांचा वापर करुन सुड बुद्धीने वागत असून निरपराध लोकांना त्रास देण्याचे काम करीत असल्याचे सांगितले. दिलीप नाईक, मन्सूर मेमन, अमृत चौधरी यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी अक्कलकुवा व नवापूर येथील असंख्य कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला, मेळाव्याचे सूत्रसंचलन हाफीज जुबेर मक्राणी यांनी केले. आभार अमृत चौधरी यांनी मानले, कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी फिरोज मक्राणी, रफीक मक्राणी, ईस्तियाक पठाण, अनिस मेमन आदींनी परिश्रम घेतले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com