चिनोदा शेतशिवारात बिबट्यासह दोन लहान बछड्यांचा संचार

बिबट्याचा हल्ल्यात एक मेंढी जखमी
चिनोदा शेतशिवारात बिबट्यासह दोन लहान बछड्यांचा संचार

चिनोदा.ता.तळोदा । वार्ताहर taloda

तळोदा तालुक्यातील चिनोदा येथील शेतशिवारात बिबट्याची दहशत कायम असून यामुळे शेतकरी, शेतमजूर, ग्रामस्थ तसेच मेंढपाळ यांच्यामध्ये प्रचंड घबराटीचे वातावरण पसरले आहे.

दि.२९ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ ते १ वाजेच्या सुमारास साक्री तालुक्यातील ऐचांळे येथील मेंढपाळ सुका गयखू ठेलारी हे चिनोदा येथील नाल्यालगत असलेल्या शेतात शेळ्या व मेंढ्या चारत असतांना अचानक बिबट्याने शेळ्या व मेंढ्याच्या कळपावर हल्ला केला मात्र तेथील मेंढपाळांनी आरडाओरड केल्याने बिबट्याने तेथून पळ काढला. मात्र बिबट्याचा हल्ल्यात एक मेंढी जखमी झाली.

तसेच चिनोदा शेतशिवारात सध्या कापूस वेचणीसह ऊस तोडणीचे कामे सुरू असून बिबट्याचा मुक्त संचाराने शेतकरी, शेतमजूर, ग्रामस्थ तसेच मेंढपाळ यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर भितीचे वातावरण आहे. यावेळी सदर घटनेची माहिती कळताच तळोदा वन विभागाचे वनक्षेत्रपाल निलेश रोडे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल नंदु पाटील, वनरक्षक गिरधन पावरा, वनरक्षक लक्ष्मी पावरा, वनरक्षक राज्या पावरा आदींसह ग्रामस्थ मानसिंग पाडवी, रविंद्र पटेल यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com