
नंदुरबार nandurbar । प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील खेडदिगर येथुन चार चाकी वाहन (Four wheeler)चोरी (thief) करणार्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या (local crime branch) पथकाने ताब्यात घेतले असुन 2 लाख रुपये किमतीचे वाहन हस्तगत केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि,दि. 13 ते 14 डिसेंबर दरम्यान म्हसावद पोलीस ठाणे हद्दीतील खेडदिगर गावातील हिरा मोती फर्टिलायझरचे बाजुला पंडीत गंगाराम चौधरी यांचे 2 लाख किमंतीचे पिकअप वाहन (क्र.एम.एच.39, सी. 5583) हे कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरुन नेले, म्हणुन श्री. पंडीत गंगाराम चौधरी रा- मेहरबान रोड खेतीया ता- पानसेमल जि- बडवानी यांच्या फिर्यादीवरून म्हसावद पोलीस ठाण्याते येथे अज्ञात आरोपीताविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेले वाहन धुळे शहरातील 80 फुटी रोडावर रस्त्याच्या बाजूला मिळून आल्याने चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदारांनी ते वाहन चाळीसगांव रोड पोलीस ठाणे येथे आणून उभे केलेले होते. सदर माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांना मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ एक पथक तयार करुन धुळे येथे रवाना केले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सदर वाहनाबाबत खात्री करुन ताब्यात घेतले होते, परंतु चोरी करणारे आरोपी मात्र अद्याप मिळून आलेले नव्हते.
पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी 22 ते 23 डिसेंबर दरम्यान रात्री संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यात नाकाबंदी लावण्यात आलेली होती व े पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील हे जिल्ह्यातील प्रत्येक नाकाबंदीच्या ठिकाणी भेटी देत होते.. त्यादरम्यान पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सुमारे 8 ते 9 दिवसापूर्वी म्हसावद पोलीस ठाणे हद्दीतील खेडदिगर गावातून चोरी झालेली पिकअप ही बेहडीया ता.पानसेमल जि.बडवाणी मध्य प्रदेश येथील सुनिल पावरा, पिंटु ओंकार भिल यांनी मिळून केलेली असून सुनिल पावरा हा सद्या खेडदिगर गावात फिरत आहे, अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांना कळविल्यानंतर त्यांनी म्हसावद पोलीस ठाणे हद्दीत नाकाबंदी करीत असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला कळवून बातमीची खात्री करून तात्काळ संशयीतांना ताब्यात घेवून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संशयीत आरोपी याचा खेडदिगर गावात व परिसरात शोध घेतला असता खेडदिगर गावात मारुती मंदीराजवळ सुनिल सुरेश पावरा रा. बाजार पेठ मार्ग, बोरकुंड ता. जि. धुळे ह.मु. बेहडीया ता. पानसेमल,जिल्हा बडवाणी,मध्य प्रदेश याला अटक केली.सुनिल पावरा यानेे सुमारे 8 ते 9 दिवसापूर्वी त्याचा नातेवाईक पिंटु ओंकार भिल रा. बेहडीया ता. पानसेमल जि.बडवाणी याच्या मदतीने खेडदिगर येथून रात्रीच्यावेळी एक पिकअप वाहन चोरी केल्याचे सांगितले.
तसेच चोरी केलेले पिकअप वाहन हे धुळे येथे विक्री करण्याच्या उद्देशाने घेवून गेलो होतो, परंतु सदरचे वाहन विक्री न झाल्याने ते धुळे शहरातील 80 फुटी रोडावर रस्त्याच्या बाजूला उभे करुन तेथून तो व त्याचा साथीदार पिंटु भिल तेथून पळुन गेलो बाबत सविस्तर हकिगत सांगितली. त्याअनुषंगाने पिंटु ओंकार भिल रा. बेहडीया ता. पानसेमल जिल्हा बडवाणी याचा बेहडीया व आजू-बाजूच्या परिसरात शोध घेतला असता तो मिळून आला नाही.
ताब्यात घेण्यात आलेला आरोपी व गुन्ह्यातील 2 लाख रु. किं.चे एक पांढर्या रंगाचे पिकअप वाहन (क्र.एम.एच.39, सी. 5583)असे गुन्ह्याच्या पुढील तपासकामी म्हसावद पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलीस अधिक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, पोलीस हवालदार विनोद जाधव, सजन वाघ, पोलीस नाईक जितेंद्र अहिरराव, गोपाल चौधरी, पुरुषोत्तम सोनार, मोहन ढमढेरे यांच्या पथकाने केली आहे.