अवैध बायोडिझेल विक्रीप्रकरणी चार ठिकाणी छापे

खापर परिसरात प्रांताधिकारी मैनक घोष यांची धडक कारवाई, भुमिगत टाक्या जेसीबीच्या साहयाने नष्ट
अवैध बायोडिझेल  विक्रीप्रकरणी चार ठिकाणी छापे

नंदुरबार । Nandurbar। प्रतिनिधी

अक्कलकुवा तालुक्यातील खापर (Khapar) परिसरात अवैधरित्या (illegal) बायोडिझेल विक्री (biodiesel sales) होत असल्याच्या तक्रारीवरून प्रांताधिकारी (Prantadhikari) डॉ. मैनाक घोष (Dr. Manak Ghosh) यांच्यासह पथकाने बर्‍हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावरील चार ढाबे व हॉटेल्सवर धाडी (raids) टाकली. यात दोन ठिकाणी बायोडिझेलच्या साठवणूकीसाठी असलेल्या सुमारे 20 लिटर क्षमतेच्या दोन भूमिगत टाक्या पथकाने जेसीबीच्या मदतीने काढून नष्ट करण्यात आल्या.

खापर ता.अक्कलकुवा परिसरात मंगळवारी रात्री अक्कलकुवा पोलिसांच्या मदतीने महसूल प्रशासनाने हॉटेल महादेव, हॉटेल टीप टॉप, उदेपूर येथील हॉटेल हरी कृष्णा व गुलीउंबर येथील आर.टी.ओ. चेकपोस्टजवळील हॉटेल साईआनंद या 4 हॉटेल्सवर सायंकाळी 4 वाजेपासून ते रात्री 8 वाजेपर्यंत धाडी टाकत कारवाई केली. खापर परिसरात प्रांताधिकारी मैनाक घोष यांच्या मार्गदर्शनाखाली पथक दाखल झाल्यानंतर त्यांनी बायोडिझेलचा शोध घेऊनही बायोडिझेल मिळाले नाही.

मात्र, प्रांताधिकार्‍यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे तपासणी केली असता 20 फूट खोल जमिनीत बायोडिझेलची टाकी आढळली. या 20 हजार लिटरच्या टाकीला जेसीबीच्या मदतीने बाहेर काढून नष्ट करण्यात आली. दरम्यान, हॉटेल टीपटॉप येथेही धाड टाकत पत्र्याचे शेड नष्ट केले. हॉटेल हरीकृष्णा येथे 20 हजार लिटरची रिकामी लोखंडी टाकी आढळली.

हॉटेल साईआनंद येथे 5 हजार लिटरच्या 5 रिकाम्या व 1 मिश्रित बायोडिझेल टाकी आढळून आली. तेथेही जेसीबीच्या मदतीने टाक्या नष्ट करण्यात आल्या. हॉटेल महादेव येथे बायोडिझेलची 20 हजार लिटरची लोखंडी रिकामी टाकी हॉटेलच्या पाठीमागे जमिनीतून मिळाली. जेसीबीच्या मदतीने सदरच्या टाक्या नष्ट करण्यात आल्या.

सदर कारवाईत प्रांताधिकारी डॉ.मैनाक घोष,अक्कलकुवा येथील नायब तहसिलदार दिलीप गांगुर्डे, पुरवठा निरीक्षक जी.आर.बागले, अक्कलकुवा पोलिस निरीक्षक आय.एन.पठाण, गिरीष सांगळे, पोहेकॉ. मोहन शिरसाठ, कल्पेश कर्णकाळ, अजीत गावित आदींच्या पथकाने केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com