माजी आ.चंद्रकांत रघुवंशी शिंदे गटात दाखल होणार?

माजी आ.चंद्रकांत रघुवंशी शिंदे गटात दाखल होणार?

नंदुरबार nandurbar । प्रतिनिधी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्या गटाचे दोन निरीक्षक (Two observers of the group) दोन दिवसांपुर्वी नंदुरबार जिल्हा दौर्‍यावर आले होते. त्यांच्या उपस्थितीत शहरातील सीबी लॉनमध्ये जिल्हयातील जि.प.सदस्य, नगरसेवक, पं.स.सदस्य, मार्केट कमिटी संचालक आदींकडून शिंदे गटाला समर्थनाचे फॉर्म (Forms of support to the Shinde group) भरुन घेतल्याचे समजते. त्यामुळे माजी आ.चंद्रकांत रघुवंशी (Former MLA. Chandrakant Raghuvanshi) हे दि. 22 किंवा 23 जुलै रोजी मुंबई येथे शक्तीप्रदर्शनासह शिंदे गटात (join Shinde group )दाखल होणार असल्याची चर्चा आहे.

गेल्या महिनाभरापासून राज्यातील शिवसेनेला फुटीचे ग्रहण लागले आहे. सुरुवातीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह बंड पुकारात थेट मुख्यमंत्रीपदापर्यंत मजल मारली. त्यानंतरही शिवसेनेची गळती थांबलेली नाही. दररोज आमदार, खासदार, नगरसेवक यांच्यासह नेते शिंदे गटात दाखल होत आहेत.

दरम्यान, दि.16 जुलै रोजी शिंदे गटातील दोन निरीक्षक नंदुरबार जिल्हयात आले होते. त्यांनी शहरातील सीबी लॉन्स येथे शिवसेना कार्यकर्ते, पदाधिकारी, नेत्यांची भेट घेतली. उपलब्ध माहितीनुसार, त्यांनी जिल्हयातील शिवसेनेचे नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, मार्केट कमिटीचे संचालक, विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक आदींशी चर्चा करुन शिंदे गटाला समर्थन असल्याचे फॉर्म भरुन घेतल्याचे समजते. तसेच काही नेत्यांचीही भेट घेतली आहे. त्यामुळे माजी आ.चंद्रकांत रघुवंशी हे दि.22 किंवा 23 जुलै रोजी मुंबई येथे जोरदार शक्तीप्रदर्शन करत शिंदे गटात दाखल होणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com