नवापूर तालुक्यात दोन ठिकाणी वनविभागाचे छापे

पावणे दोन लाखांचा मुद्देमाल हस्तगत, दोघांविरुद्ध वनगुन्हे
नवापूर तालुक्यात दोन ठिकाणी वनविभागाचे छापे

नवापूर Navapur । श.प्र.-

नवापूर शहरासह तालुक्यात वनविभागाने (Forest Department) दोन ठिकाणी छापे (raid)टाकून अवैध तोडीच्या सागवानी, सिसम जातीच्या चौपाट असा सुमारे 1 लाख 80 हजाराचा मुद्देमाल जप्त (Seizure of property) केला आहे. याप्रकरणी दोघांविरुद्ध वनगुन्हे दाखल करण्यात आला आहे.

नवापूर शहरातील भारत फर्निचर मार्ट येथे सागवानी व सिसम जातीच्या लाकडांचे 36 नग अवैध चौपाट आढळून आले. या लाकडाची किंमत दीड लाख रुपये आहे. याबाबत वनगुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नंदुरबार येथील सहाय्यक वनसंरक्षकांना मिळालेल्या गुप्त बातमीवरून नवापूर वनक्षेत्रपाल व कर्मचारी तसेच व चिंचपाडा प्रादेशिकसह कर्मचार्‍यांनी नवापूर शहरातील आसद अब्बास कुरेशी यांच्या भारत फर्निचर मार्ट येथे जाऊन त्यांच्या फर्निचर मार्टची सर्च वॉरंटने झडती घेतली असता तेथे कुर्‍हाडीने घडतळ केलेले साग चौपट नग 23 व सिसम 13 चौपाट नग असे एकूण 36 नग मिळून आले. सदर मालाची बाजार भावानुसार अंदाजीत किंमत दीड लाख रुपये आहे.

या सदर कारवाईत सहाय्यक वनसंरक्षक धनंजय पवार प्रादेशिक व वन्यजीव नंदुरबार, श्रीमती स्नेहल अवसरमल वनक्षेत्रपाल नवापूर प्रादेशिक भिवाजी दराडे, वनपाल खेकडा, ए.एम शेख वनपाल बोरझर, सुनिता पाटील वनपाल वडकळंबी, वनरक्षक कल्पेश अहिरे, कमलेश वसावे, संतोष गायकवाड, विकास शिंदे, अशोक पावरा गिरीश वळवी, सुनिता बडगुजर, भाग्यश्री पावरा, तुषार नांद्रे, रामदास पावरा, संजय बडगुजर आशुतोष पावरा वाहन चालक साहेबराव तुंगार, दिलीप गुरव, वनमजूर छगन सोनवणे बाळा गावित, फिलिप गावित यांनी सहभाग भाग घेतला.

चिचलीपाडा

शनिवारी रोजी सहाय्यक वनसंरक्षक नंदुरबार यांना मिळालेल्या गुप्त बातमीवरून त्यांच्यासह वनक्षेत्र स्टाफ चिंचपाडा प्रा.नवापूर प्रादेशिक यांचे सह चिचलीपाडा गावात जाऊन दिनेश बिजला गावित रा.चिचलीपाडा याच्या घराची सर्च वॉरंटने झडती घेतली असता त्यांच्या राहत्या घराच्या पडसाळीत कुर्‍हाडीने घडतळ केलेले साग चौपट नग 18 व तयार पलंग नग 1 मिळून आले.

सदर मालाची बाजार भावानुसार अंदाजीत किंमत 30 हजार रुपये आहे. सदर कारवाईत सहाय्यक वनसंरक्षक धनंजय पवार, वनरक्षक संतोष गायकवाड, विकास शिंदे, तुषार नांद्रे, संजय बडगुजर, रामदास पावरा, आशुतोष पावरा, वाहन चालक साहेबराव तुंगार, रोपवन रखवालदार बाळा गावीत यांनी सहभाग घेतला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com