अक्कलकुवा येथे आठवडाभरापासून सफाई कामगारांचे काम बंद आंदोलन

शहरात साचले घाणीचे समाज्य, ग्रामपंचायतीतर्फे वेतन देण्याची मागणी
अक्कलकुवा येथे आठवडाभरापासून सफाई कामगारांचे काम बंद आंदोलन

खापर Khapar ता.अक्कलकुवा । वार्ताहर

अक्कलकुवा ग्रामपंचायतीचे (Gram Panchayat) सफाई कामगारांना (cleaning workers) गेल्या काही महिन्यांपासून वेतन (Salary) नसल्यामुळे त्यांनी गेल्या आठवडाभरापासून काम बंद आंदोलन (Work stop movement) केल्याने शहरात तसेच मुख्य बाजारपेठेत कचर्‍याचे ढीग साचले आहेत.

अक्कलकुवा ग्रामपंचायतीत कार्यरत असलेल्या सफाई कामगारांना (cleaning workers) गेल्या अनेक महिन्यांपासून वेतन नसल्यामुळे वेतन (Salary) मिळावे या मागणीसाठी काम बंद आंदोलन सुरू केले आहे शहरासह शहरातील मुख्य बाजारपेठांमध्ये स्वच्छता होत नसल्यामुळे ठिकठिकाणी कचर्‍याचे ढीग(Garbage heap) साचले आहेत या कचर्‍यामुळे काही ठिकाणी दुर्गंधी निर्माण झाली असून याबाबत वरिष्ठ प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित तोडगा काढावा अशी तीव्र मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

अक्कलकुवा ग्रामपंचायतीत (Gram Panchayat) कार्यरत असलेल्या सफाई कामगारांना वेळोवेळी वेतन न मिळण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे गेल्या महिन्यात देखील वेतनासाठी सफाई कामगारांतर्फे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले होते.

या सफाई कामगारांच्या वेतनाच्या प्रश्न वेळोवेळी उद्भवत असल्याने नागरिकांना शहरासह मुख्य बाजारपेठेत सर्वत्र स्वच्छतेतून मार्ग काढावा लागत आहे अनेक ठिकाणी साचलेल्या कचर्‍याच्या ठिकाण मुळे दुर्गंधीही पसरली आहे यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे याबाबत वरिष्ठ प्रशासनाने (Administration) तोडगा काढावा अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com