शहाद्यात सव्वा दोन लाखाचे खाद्यपदार्थ जप्त

अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई
शहाद्यात सव्वा दोन लाखाचे खाद्यपदार्थ जप्त

शहादा Shahada| ता.प्र.

शहादा येथील मे फ्रायो फुड्स (May froyo foods) या पेढीतून २ लाख २४ हजार रुपये किमतीचे नमकिन व शेवसाठा (Namkin and Shev satha) जप्त (confiscation) करण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाने (Department of Food and Drug Administration) ही कारवाई (action) केली आहे.

गणेशोत्सव ते दिवाळी या सणासुदीच्या काळात मिठाई व फरसाणची मोठ्या प्रमाणावर विक्री होत असते. अनेक दुकानमालक नागरिकांच्या आरोग्याला नुकसान होईल, असे पदार्थ बनवून विक्री केले जात असल्याने नंदुरबार अन्न औषध प्रशासन विभागाकडून कारवाई सुरू आहे.

नंदुरबार शहरातील बिकानेर स्वीट मार्ट, हॉटेल राजस्थान या ठिकाणाहून अन्नाचे नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले असून अहवाल प्राप्त झाल्यावर पुढील कारवाई करण्यात येणार आहे. तर शहादा शहरात अन्न औषध प्रशासन विभागाच्या कारवाईत सव्वा दोन लाखाचे खाद्यपदार्थ जप्त करण्यात आले आहे.

विना परवाना व्यवसाय करणाऱ्या मे फ्रायो फुड्स या पेढीला भेट देऊन अन्नपदार्थाचे नमुने तपासणीसाठी घेतले आहे. त्यात २ लाख २४ हजार रुपये किमतीचे नमकीन व शेवसाठा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई अन्नसुरक्षा अधिकारी पवार, सहाय्यक आयुक्त संतोष कांबळे यांच्या पथकाने केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com