अर्धवेळ ग्रंथपालांना पुर्णवेळ करण्यासाठी हे निकष लागणार?

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद व ग्रंथालय शिक्षक विभागाचा पाठपुरावा
अर्धवेळ ग्रंथपालांना पुर्णवेळ करण्यासाठी हे निकष लागणार?

बोरद | वार्ताहर- BORAD

अर्धवेळ ग्रंथपालांना पुर्णवेळ करण्याबाबत १ हजार विद्यार्थी (Student) संख्येचे निकष सध्या निश्चित केले असून दोन ते तीन शाळा (School) मिळून त्यांना पूर्णवेळ करण्याची प्रक्रीया सुरु होणार आहे. ग्रंथपाल पुर्णवेळ होण्याबाबत (Maharashtra State Teachers Council) महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद व ग्रंथालय शिक्षक विभागाने सातत्याने पाठपुरावा केला आहे.

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची पुणे येथे शिक्षण आयुक्त सुरज मांढरे, शिक्षण संचालक महेश पालकर यांच्यासमवेत बैठक आयोजित करण्यात आली होती.

यावेळी शिक्षक परिषदेचे आ.नागो गाणार, राज्याध्यक्ष वेणुनाथ कडू, कार्यवाह नरेंद्र वातकर, माजी आमदार भगवानराव साळुंके आदी उपस्थित होते. या बैठकित अर्धवेळ ग्रंथपालांना पुर्णवेळ करण्याबाबत १ हजार विद्यार्थी संख्येचे निकष सध्या निश्चित केले आहे.

दोन ते तीन शाळा मिळून पुर्णवेळ करण्याची प्रक्रीया सुरु होणार आहे. ग्रंथपाल पदासाठी विद्यार्थी संख्या शिथिल करण्याबाबत व अर्धवेळ ग्रंथपाल पुर्णवेळ होण्याबाबत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने व ग्रंथालय शिक्षक विभागाने सातत्याने पाठपुरावा केला आहे.

आ.गाणार यांनी शिक्षण आयुक्त व शिक्षण संचालकांना यासंदर्भातील कार्यवाही त्वरीत करावी व अनेक वर्षापासून पुर्णवेळच्या प्रतिक्षेत असलेल्या ग्रंथपालांचे स्वप्न मानवतेच्या दृष्टीकोनातून पूर्ण करावे अशी मागणी केली आहे.

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनीही अर्धवेळ ग्रंथपाल पुर्णवेळ होण्यासाठी होकार दिला असून यासंदर्भात लवकरच कार्यवाही होणार असल्याचे आश्वासन शिक्षक व पदवीधर आमदारांच्या बैठकीत दिले असल्याचे आ.गाणार यांनी दिले.

या बैठकित आ.डॉ.सुधीर तांबे, आ.विक्रम काळे उपस्थित होते. त्यामुळे या संदर्भातील कार्यवाहीच्या हालचालींना वेग आल्याचे गाणार यांनी सांगितले. शिक्षण विभागाने आता विलंब न करता अर्धवेळ ग्रंथपाल पुर्णवेळ करण्याबाबतची कार्यवाही करावी.

अनेक ग्रंथपाल सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असल्यामुळे सेवानिवृत्तीपुर्वी ते पुर्णवेळ व्हावी ही अपेक्षा महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे ग्रंथालय शिक्षक विभाग अध्यक्ष विलास सोनार यांनी व्यक्त केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com