कात्री येथील हाडनदी व हाकऱ्या नदीला पूर

कात्री येथील हाडनदी व हाकऱ्या नदीला पूर

मोलगी Molgi | वार्ताहर

धडगांव (Dhadgaon) तालुक्यातील कात्री (Flood to Hadnadi and Hakarya rivers at) परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे (torrential rains) गावाच्या हाडनदी (Hadnadi) व  हाकऱ्या नदीला (Hakarya rivers) पूर (Flood) आला असून नदीच्या पुलावरून चार पाच फुटावरून पाणी वाहत असल्याने सकाळी १० वाजेपासुन संध्याकाळी सात वाजेपर्यंत पुलावरून पाणी वाहत असल्याने या मार्गावरील वाहतुक बंद (Traffic closed) करण्यात आली होती

माकडखुड, पोहला, वाहवानी, कात्री फाॅरेस्ट, कात्रीचे बाराही पाडे, मोजापाडा, सिगलीबार, वेलखेडी, डेब्रामाळ, तसेच धडगांव-मोलगी रस्त्याचा संपर्क तुटल्याने नागरीक व वाहनधारकांची गैरसोय झाली. नदीला लागुनच असलेल्या कात्रीसह, शेल्टीखेडीपाडा, पाटीलपाडा, पाडावपाडा, ओखलापाडा येथील शेतांचे नुकसान झाले आहे.

कात्रीच्या हाकऱ्या नदीवरील पुलाच्या भराव वाहुन गेल्याने धडगांव येथे जाण्याचा मार्ग बंद पडला आहे. सोनचा लहान पुल पहिल्या पावसात खचल्याने वाहनधारकांसह या मार्गावरील शालेय विद्यार्थ्यांना गैरसोयीचे झाले आहे. संबंधित विभागाने पर्यायी व्यवस्था करावी अशी मागणी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक संदीप वळवी यांनी केली आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com