नंदुरबारात आग, लाखोंचे नुकसान

नंदुरबारात आग, लाखोंचे नुकसान

नंदुरबार Nnadurbar| प्रतिनिधी -

लक्ष्मी पूजनाच्या (Lakshmi Pujan) सायंकाळी शहरातील यार्दीच्या राम मंदिराजवळ (Ram temple) शॉर्ट सर्किटमुळे (short circuit) आग (Fire) लागून लाखो रुपयांचे नुकसान (Loss of millions of rupees) झाले. सुदैवाने घरात कोणीही नसल्याने अघटित घडले नाही.

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सायंकाळी साडे सात च्या सुमारास शहरातील यार्दीच्या राम मंदिराजवळील एका घराला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. घरात लाकडी पलंग व इतर लाकडी वस्तू असल्याने आगीने लगेच पेट घेतला. परिसरातील नागरिकांनी मिळेल त्या साधनांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला.

मात्र आग वाढतच गेल्याने नगरपालिकेच्या अग्निशमन बंबला पाचारण करण्यात आले. त्यामूळे तासाभरानंतर आग विझविण्यात यश आले. तोपर्यंत घरातील दूरदर्शन संच, पलंग याशिवाय इतर अनेक वस्तू जाळून खाक झाल्या. रात्री उशिरापर्यंत आगीबाबत नोंद करण्याचे काम पोलीस ठाण्यात सुरू होते. याप्रसंगी नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांच्यासह वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com