अखेर वीर पत्नीस शासकीय शेतजमीन मिळाली
USER

अखेर वीर पत्नीस शासकीय शेतजमीन मिळाली

18 वर्षानंतर प्रत्यक्ष शेतजमिनीचा मिळाला ताबा

नंदुरबार । Nandurbar। प्रतिनिधी

नंदुरबार जिल्हयातील पहिले शहीद जवान ज्ञानेश्वर मधुकर पाटील (Martyr Jawan Dnyaneshwar Madhukar Patil) यांच्या विरपत्नी श्रीमती माधुरी ज्ञानेश्वर पाटील (Wife Mrs. Madhuri Dnyaneshwar Patil) यांना शासनातर्फे 18 वर्षानंतर प्रत्यक्ष शेतजमिनीचा ताबा (Possession of agricultural land) मिळाला.त्यांना शासकीय जमीन मिळण्यासाठी 18 वर्ष वाट पहावी लागली हे खेदजनकच म्हणावे लागेल

नंदुरबार जिल्हयातील पहिले शहीद अमर जवान ज्ञानेश्वर मधुकर पाटील यांची विरपत्नी श्रीमती माधुरी ज्ञानेश्वर पाटील यांना जिल्हाधिकारी , नंदुरबार यांच्याकडील आदेश दि. 11 जुन 2020 अन्वये तहसिलदार नंदुरबार यांचे समक्ष तलाठी लहान शहादा, ता. नंदुरबार यांनी सोमवार दि.10 जानेवारी 2022 रोजी प्रत्यक्ष शासकीय शेतजमीनीचा ताबा दिला.शहीद जवान ज्ञानेश्वर मधुकर पाटील मराठा रेजिमेंट सव्हींस नं.2791931 एन.यांना दिनांक 19 नोव्हेंबर2004 रोजी जम्मु कश्मिर ओपीरक्षक मोहिमेत विरमरण आल्याने त्यांचे कायदेशिर वारस म्हणुन माधुरी पाटील असल्याने सैनिकांच्या वारसांना शासनाच्या धोरणानुसार शासकीय जमिनीचा लाभ मिळण्यासाठी दि.26 एप्रिल2018 रोजी जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्याकडे विनंती मागणी केली होती त्या अनुषंगाने लहान शहादा, ता.जि.नंदुरबार येथील शासकीय शेतजमीन गट नं.83 क्षेत्रापैकी क्षेत्र 2 हे.00 आर.डॉ.राजेंद्र भारुड, तत्कालीन जिल्हाधिकारी,नंदुरबार यांनी दि.11 जुन 2020 आदेश दिला होता.त्या आदेशान्वये उपअधिक्षक, भुमी अभिलेख, नंदुरबार यांनी दि.31 मार्च 2021 रोजी शासकीय शेतजमिनीची मोजणी करून दिली.

त्याअनुषंगाने तलाठी यांनी 25 नोव्हेंबर 2021 रोजी 7/12 उतारा प्रधान केला होता.जमीन खेडण्यासाठी शासकीय शेतजमिन गट नं. 83/2 प्रत्यक्षात ताबा तहसिलदार भाऊसाहेब थोरात व मंडळ अधिकारी, कोरीट राहुल देवरे व तालुका भूमिअभिलेख निरिक्षक,नंदुरबार यांचे समक्ष तलाठी श्रीमती.संध्या वळवी यांनी ताबा दिला आहे. त्याबद्दल सर्व मान्यवरांचे माधुरी पाटील यांनी आभार मानले आहेत व विरजवान ज्ञानेश्वर पाटील यांना शासनाने खरी श्रध्दांजली अर्पित केल्याने समाधान व्यक्त केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com