अखेर महिन्यानंतर पोलीस निरीक्षकपदी पंडीत सोनवणे रुजू

दै. देशदूतच्या वृत्तानंतर झाली नियुक्ती, एका महिन्यापासुन होते पद रिक्त
अखेर महिन्यानंतर पोलीस निरीक्षकपदी
पंडीत सोनवणे रुजू

मोदलपाडा Modalpada ता.तळोदा । वार्ताहर

तळोदा (Taloda) येथील पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पद (Post of Police Inspector) हे गेल्या एक महिन्यांपासून रिक्त (empty) होते व यामुळे पोलीस स्टेशनचा गाडा हा प्रभारीच्या खांद्यावर सुरू होता.या आधारावर देशदूतने वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची पोलीस प्रशासनाने दखल घेत तळोदा पोलीस स्टेशनला पंडीत सोनवणे हे पोलीस निरीक्षक म्हणून रुजू (Join) झाल्याने तळोदा शहरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

तळोदा शहरात चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत तसेच तळोदा तालूका हा बर्‍हाणपूर- अंकलेश्वर महामार्गावरील असल्याने काही वेळेस वादविवाद देखील उदभवात आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासनाने याकडे लक्ष घालून पोलीस निरीक्षकाची नियुक्ती तात्काळ करावी अशी मागणी करण्यात येत होती.

तळोदा येथील पोलीस निरीक्षक केलसिंग पावरा यांची धुळे येथे बदली झाली होती . व गेल्या एक महिन्यांपासून त्यांचा पदभार हा सहाय्यक पोलीस निरीक्षक अमितकुमार बागुल यांच्याकडे सोपविण्यात आला होता. तळोदा शहरात मागील काही दिवसांपासून शहरात दुचाकी चोरी, तसेच घरफोडी करून अज्ञात चोरटे लाखोंचा माल पळवित असल्याच्या घटना शहरात दिवसेंदिवस वारंवार घडत होत्या. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

देशदूतचे प्रसिद्ध वृत्त
देशदूतचे प्रसिद्ध वृत्त

तळोदा पोलीस स्टेशनमध्ये पोलीस कर्मचार्‍यांची संख्या देखील कमी असल्याने काही मोजक्या कर्मचार्‍यांवर याचा ताण पडत आहे. यामुळे कर्मचारी संख्या देखील वाढवावी अशी मागणी देखील करण्यात येत आहे. तळोदा येथील पोलीस ठाण्यास तळोदा तालुक्यातील 128 गावे जोडली आहेत. यात अक्कलकुवा तालुक्यातील तळोद्याच्या सीमेस लागून असलेली नऊ गावेदेखील जोडलेली आहे.

या पोलीस ठाण्याचे क्षेत्रफळ 66 मैलार्पयत विस्तारलेले आहे. नंदुरबार जिल्ह्यात तळोदा ठाणे असे एकमेव आहे की, ज्याच्यात दोन तालुक्यातील गावांचा समावेश असल्याचे म्हटले जाते. सदर पोलीस ठाण्यास बोरद, मोदलपाडा व कोठार अशा तीन दूरक्षेत्रांचादेखील बंदोबस्ताच्या पार्श्वभूमिवर विभागणी करण्यात आली आहे. साहजिकच सातपुड़यातील माळखुर्द, एकधड, बोरवन, टाकली, अशा अनेक गावे अन् पाड़यांचा समावेश या ठाण्यात आहे. आता पोलीस स्टेशन ला पोलीस निरीक्षक रुजू झाल्याने तळोदा शहरातील व तालुक्यातील गुन्हेगारीला आता वचक बसेल अशी अपेक्षा शहरातील नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com