आदिवासी जनजागृतीपर गिताचे चित्रीकरण पूर्ण

अ‍ॅड.सुभाष वळवी यांचा स्तुत्य उपक्रम
आदिवासी जनजागृतीपर गिताचे चित्रीकरण पूर्ण

मोलगी molagi । वार्ताहर-

आदिवासी समाजात (Tribal society) पसरत चाललेली व्यसनाधीनता, (addiction,) युवकांच्या टोळ्या (Youth gangs) यामुळे ऐन तरुणवयात वाट चुकणे, शिक्षणापासून दूर (away from education)होऊन गैरकृत्यात अडकणे (fall into misdeeds,) परिणामी बेरोजगारी, अशिक्षितपणा आणि कुपोषण यासारख्या गंभीर समस्यांच्या विळख्यात (midst of serious problems)अडकणार्‍या नवतरूणाईसाठी (youth) एका गाण्याच्या (song) माध्यमातून संदेश म्हणून अ‍ॅड. सुभाष वळवी यांनी एका गीताचे चित्रीकरण (Filming of Geeta) केले आहे.

तिन्ही राज्यांच्या विविध भागात आपल्या अभिनयाने लोकांच्या मनात घर करून असलेल्या कलाकारांच्या सहप्रयत्नाने, गाण्याचा माध्यमातून व्यसनमुक्ती संदेश हा संकल्प पुढे ठेवत या गीताची निर्मिती करण्यात आली आहे. गीतरचना अ‍ॅड.सुभाष वळवी यांनी केली आहे. संगीतबद्ध मध्य प्रदेशातील संगीतकार प्रसिद्ध गायक संजय किराडे यांचे चिरंजीव रितेश किराडे यांनी केले आहे. गायक म्हणून भगदरी येथील पार्श्वगायक विश्वनाथ पाडवी व सहगायिका म्हणून धानोर्‍याचे पल्लवी वसावे यांनी काम केले आहे.

मागील महिन्यापासून सदर गीताचे चित्रीकरण प्रस्तावित होते.परंतु पावसाअभावी चित्रीकरणास करण्यात विलंब झाला. या गीतात मुख्य अभिनयाच्या रूपाने गुजरात मधील अभिनेते तरुण वसावा तर अभिनेत्री म्हणून सारू वसावा यांनी काम केले आहे. गीताचे चित्रीकरण पुष्पेंद्र भोसले (कॅमेरामॅन), हाकेश ठाकूर (ड्रोन शूटर), सजावट आकाश बर्डे, आकाश भामरे (चारही रा.मध्य प्रदेश) यांनी केले आहे.

चित्रीकरणाच्या प्रारंभी समस्त हुंडा-रोषमाळ गावकर्‍यांच्या हस्ते जंगी स्वागत करत उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी नर्मदा परिसर विकास बहुउद्देशिय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.बाबूलाल पावरा यांनी प्रास्ताविक केले. सलग तीन दिवस रात्र-दिवस चालणारे चित्रीकरण व्यवस्थित पार पाडण्यासाठी संबंध गावकर्‍यांचे सहकार्य लाभले. समारोप कार्यक्रमाअंती गीतकार/कवी व सदर गीताचे निर्माते सुभाष वळवी यांनी भावनिक मनोगत व्यक्त केले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com